ॲनी हिडाल्गो: शिंपी आणि मजुराची मुलगी बनणार फ्रान्सची पहिली महिला राष्ट्रपती?
Anne HidalgoDainik Gomantak

ॲनी हिडाल्गो: शिंपी आणि मजुराची मुलगी बनणार फ्रान्सची पहिली महिला राष्ट्रपती?

ॲनी (Anne Hidalgo) यांचे नाव अनेक प्रकारे विशेष असून त्या पॅरिसच्या महापौर असून त्या या पदग्रहण करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.

फ्रान्समध्ये (France) पुढील वर्षी निवडणुका होणार असून आत्तापासूनच राष्ट्रपती होण्यासाठी उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे. ॲनी हिडाल्गोचे (Anne Hidalgo) नाव देखील फ्रान्समध्ये जास्त चर्चेलं जात आहे. ॲनी यांचे नाव अनेक प्रकारे विशेष असून त्या पॅरिसच्या महापौर असून त्या या पदग्रहण करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. समाजवादी (Socialist) विचारसणीचा पुरस्कार करणाऱ्या ॲनी 14 वर्षांची होत्या तेव्हा आपल्या कुटुंबासह फ्रान्समध्ये आल्या इथेच स्थायिक झाल्या. त्यांचा जन्म स्पेनमध्ये (Spain) जून 1959 मध्ये झाला. तीन मुलांची आई असलेल्या ॲनी पहिल्या महिला उपमहापौर झाल्या आणि 2014 पासून पॅरिसच्या महापौरपदाची (Mayor) जबाबदारी सांभाळत आहेत. 2020 मध्ये त्यांची पुन्हा जनतेने या पदासाठी निवड केली.

Anne Hidalgo
‘देशात फक्त संकट आणा' निवडणुकीपूर्वी बोल्सोनारोंच्या विरोधात जनतेचा आक्रोश

वडील शिपयार्डमध्ये मजूर, आई शिंपी

त्यांनी नोमर्डीच्या राउनमध्ये भाषण दिले आणि या भाषणादरम्यान त्यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यांनी लोकांना सांगितले की, माझा जन्म स्पेनमध्ये झाला असला तरी मी पूर्णपणे फ्रेंच आहे. ॲनीचे वडील कॅडीज शिपयार्डमध्ये मजूर होते आणि आई शिंपी म्हणून काम करत होती. त्या पुढे म्हणाल्या की, राष्ट्रपतीची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपण पूर्णपणे तयार आहोत.

दरम्यान, ॲनी यांनी यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. त्यांनी अध्यक्ष मॅक्रॉन यांना अहंकारी म्हणत, फ्रान्समधील मुलांना ते चांगलं भविष्य देऊ शकत नाही. जर आपण निवडणूक जिंकली तर फ्रान्सच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान एका स्त्रीकडे येईल. हिडाल्गोला टाइम्स मॅगझिनने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तीपैकी एक असे नमूद करत त्यांचा गौरव केला.

अॅनी पॅरिसमध्ये खूप लोकप्रिय

ॲनीला त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात फ्रान्स जनतेमध्ये बऱ्याच लोकप्रिय आहेत. पॅरिसने कोविड 19 चं संकट ज्याप्रकारे हाताळले त्यासाठी अॅनी यांच्या लोकप्रियतेत अधिकच वाढ झाली. ॲनी यांनी नाईट कर्फ्यू, अनावश्यक दुकाने बंद करणे, शहरात 50 किमी सायकल लेन सुरू केली, या लेन्सेसचा उद्देश सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी करणे हा होता. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात, पॅरिसच्या कार पार्किंगच्या निम्म्याहून अधिक जागा काढून टाकण्याचा तसेच चॅम्प-लाईसेसला एका सुंदर बागेत बदलण्याचा प्रस्ताव दिला होता.

Anne Hidalgo
आर्थिक आपत्ती: लेबनॉन सरकारी कर्जामध्ये बुडाला; भाकरीसाठी रांगा, आरोग्य सेवा ठप्प

चॅम्प एलीसी बनले सुंदर गार्डन

चॅम्प एलिसीस हा पॅरिसचा सर्वात प्रसिद्ध रस्ता असून आणि त्याच्या मेकओवरची योजना सुमारे 22.5 दशलक्ष युरो किंवा सुमारे 1800 कोटी रुपये होती. या प्रकल्पाअंतर्गत आयफेल टॉवरच्या आजूबाजूस एका मोठ्या पार्कमध्ये रूपांतरित करण्याची आणि रस्त्यातून जाणाऱ्या गाड्यांची संख्या निम्म्याने कमी करण्याची योजना होती. सहसा रहदारीने गजबजलेला 'चॅम्प्स एलीसीज' लवकरच 1.2 मैल लांब ग्रीन कॉरिडॉरच्या रूपात दिसेल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com