
First Republic Bank: अमेरिकेतील आर्थिक संकट अधिक गडद होत चालले आहे. यातच, अमेरिकेची आणखी एक मोठी बँक 'फर्स्ट रिपब्लिक बँक' बुडाली.
यूएस नियामकांनी या बँकेची सर्व मालमत्ता जप्त केली आहे. त्याचबरोबर, जेपी मॉर्गन चेस बँकेने अडचणीत असलेली फर्स्ट रिपब्लिक बँक विकत घेतली आणि तिच्या सर्व ठेवी आणि मालमत्तेचे अधिग्रहण केले.
दरम्यान, एफडीआयसीने सोमवारी सांगितले की, कॅलिफोर्नियाच्या नियामकांनी फर्स्ट रिपब्लिक बॅंक बंद केली आणि रिसीव्हर म्हणून नियुक्त केले. तर जेपी मॉर्गन चेस बॅंकने फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या (Bank) सर्व ठेवी आणि मालमत्तेचे अधिग्रहण केले.
दुसरीकडे, आठ यूएस राज्यांमधील 84 फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या शाखा सोमवारी JPMorgan चेस बँकेच्या शाखा म्हणून पुन्हा उघडतील.
सॅन फ्रान्सिस्को-आधारित फर्स्ट रिपब्लिकला मार्चच्या सुरुवातीपासूनच वाईट काळांचा सामना करावा लागला होता. असे मानले जात होते की, बँक स्वतंत्र संस्था म्हणून जास्त काळ टिकू शकणार नाही.
तसेच, यूएस नियामकांच्या आपातकालीन हस्तक्षेपानंतर जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीने अडचणीत असलेल्या बँकेचा ताबा घेतला आहे.
तत्पूर्वी, ठेवीदारांनी बँकेतून जास्त पैसे काढल्यामुळे बँक आपल्या ताळेबंदातील गोंधळ साफ करण्यात अपयशी ठरली.
तर या संपादनासह, JPMorgan फर्स्ट रिपब्लिकची मालमत्ता देखील संपादन करेल, ज्यामध्ये अंदाजे $173 अब्ज कर्ज (Loan) आणि $30 अब्ज सिक्युरिटीज आणि $92 अब्ज ठेवींचा समावेश आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.