अंटार्क्टिका कोरोनापासून दूरच

पीटीआय
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

कोरोना विषाणूंपासून अंटार्क्टिका अद्याप मुक्त आहे. येथे या आजाराचा शिरकाव न झाल्याने जनजीवन नेहमीसारखे सुरळीत आहे. कोणत्याही निर्बंधांविना लोक बिनधास्त फिरू शकतात. 

जोहान्सबर्ग: कोरोना विषाणूंपासून अंटार्क्टिका अद्याप मुक्त आहे. येथे या आजाराचा शिरकाव न झाल्याने जनजीवन नेहमीसारखे सुरळीत आहे. कोणत्याही निर्बंधांविना लोक बिनधास्त फिरू शकतात. 

सध्या जगातील अंटार्क्टिका हा एकमेव खंड कोरोनाच्या विळख्यापासून दूर आहे. येथे सध्या एक हजार शास्त्रज्ञांचे संशोधनासाठी वास्तव्य आहे. येथे येणाऱ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा शिरकाव या प्रदेशात होऊ नये, यासाठीही प्रयत्न करीत आहेत. अंटार्क्टिका द्विपकल्पापासून लांब असलेल्या ब्रिटनच्या रोथेरा संशोधन तळावरील संशोधन प्रमुख रॉब टेलर यांनी ते तेथे सुरक्षित वातावरणात असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘ कोरोनापूर्व काळात जेव्हा उर्वरित जगातील जीवनमान अत्यंत मनोहारी होते त्या वेळी अंटार्क्टिकामधील संशोधक दीर्घकाळ एकांतवास, स्वावलंबन आणि मानसिक ताण सहन करीत होते. पण कोरोनामुळे अन्य देशांतही असाच अनुभव नागरिकांना अनुभवावा लागत आहे. लॉकडाउनच्या काळात ब्रिटनपेक्षा आम्ही मुक्तपणे वावरू शकत होतो.’’

संबंधित बातम्या