संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसपदी पुन्हा 'अ‍ॅन्टोनियो गुटेरस'

GUTRES.jpg
GUTRES.jpg

जगामधील सर्व देशांची संघटना असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या (United Nations) सरचिटणीसपदी अ‍ॅन्टोनियो गुटेरस (Antonio Guterres) यांनी पुन्हा एकदा नव्याने निवड करण्यात आली आहे. राष्ट्र संघाचे गुटरेस नववे सरचिटणीस आहेत. आतापर्यंत तिघांचा अपवाद वगळल्यास राष्ट्र संघातील बाकी सहा सरचिटणीसांना लागोपाठ दोन वेळा पद भूषविण्याची संधी आणि या पंरपरेनुसारच गुटरेस यांची फेरनिवड झाली आहे. अ‍ॅन्टोनियो गुटेरस हे पोर्तुगालचे माजी पंतप्रधान (Former Prime Minister of Portugal) आहेत. संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय न्यूयॉर्क (New York) येथे आहे. राष्ट्र संघाचे सरचिटणीसपद हे शोभेचे असून संयुक्त राष्ट्रांना मर्यादित अधिकार आहेत. जगभरातील देशाच्या निषेधाचा ठराव करण्यापलीकडे वाशिंक, धार्मिक किंवा अन्य कोणत्याही हिंसाचारामध्ये संयुक्त राष्ट्र संघाला हस्तक्षेप करता येत नाही. कादी देशांमध्ये आवश्यकता भासल्यास शांतिसेना पाठवून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला.(Antonio Guterres re elected UN Secretary General 

अ‍ॅन्टोनियो गुटेरस यांनी पोर्तुगालचे पंतप्रधान पद भूषविल्यानंतर 2005 ते 2015 या काळामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या  निर्वासितांच्या प्रश्नावर उच्चायुक्त म्हणून जबाबदारी गुटरेस यांनी पार पाडली होती.  पोर्तुगालमधील सोशालिस्ट पक्षाचे (Socialist Party) 1992-2002 काळात सरचिटणीस होते. पुढे ते 1995 पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी सात वर्षे म्हणजे 2002 पर्यंत त्यांनी हे पद भूषविले होते. 1995 ते 1999 या पहिल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत गुटरेस यांनी पोर्तुगालची अर्थव्यवस्था सुधारण्यावर त्यांनी भर दिला होता. या काळामध्ये त्यांनी 29 सरकारी कंपन्यांचे त्यांनी खासगीकरण केले होते. मात्र 1999 मध्ये पोर्तुगालमध्ये पार पडलेल्या निवडणूकीनंतर त्यांची फेरनिवड  झाली. 2001 मध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये गुटरेस यांच्या सोशालिस्ट पक्षाची पीछेहाट झाली आणि विशेष म्हणजे त्यांना पक्षांतर्गत बंडाळीनंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 1995 ते 2005 या कालावधीमध्ये गुटरेस यांनी सोशालिस्ट इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय समाजवादी संघटनेचे (International Socialist Organization) अध्यक्षपद भूषविले होते.  

इस्त्रायलची (Israel) राजधानी असलेल्या जेरुसलेम (Jerusalem) शहराला राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या निर्णयाला विरोध करण्यापासून मागील चार वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक घटनांवर गुटरेस यांनी वक्तव्य केले आहे. तसेच गुटरेस यांनी वातावरणीतील बदल रोखण्यासाठी त्यांनी अनुकुल अशी भूमिका घेतली होती. मागील चार वर्षांच्या सरचिटणीसपदाच्या काळामध्ये गुटरेस यांनी जागतिक पातळीवर नरसंहार, हिंसाचाराचा कठोर शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला होता. संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसपदी गुटरेस यांची फेरनिवड झाल्याने सध्याची ही धोरणे यापुढेही कायम राहतील.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com