ॲपल-१२ ची किंमत ६९ हजारापासून सुरू

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

ॲपलचा बहुप्रतिक्षित आयफोन-१२ मंगळवारी ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी बाजारात आणल्याचे जाहीर केले. जगाबरोबरच भारतालाही आयफोन-१२ बाबत उत्सुकता होती.

नवी दिल्ली:  ॲपलचा बहुप्रतिक्षित आयफोन-१२ मंगळवारी ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी बाजारात आणल्याचे जाहीर केले. जगाबरोबरच भारतालाही आयफोन-१२ बाबत उत्सुकता होती. 

आयफोन-१२ च्या किंमती ६९, ९०० पासून सुरू होत आहेत. येत्या ३० ऑक्टोबरपासून भारतीय ग्राहकांसाठी नवीन आयफोन उपलब्ध असणार आहेत. ॲपल होमपॉड मिनीची किंमत ९,९०० रुपये एवढी आहे. ॲपलने काल ५ जी सुविधा असलेले १२ श्रेणीतील चार आयफोन्स बाजारात आणले. आयफोन १२ आणि आयफोन १२ मिनी हे ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबीमध्ये निळा, काळा, पांढरा आणि प्रॉडक्ट (लाल) च्या रंगात उपलब्ध आहेत. नवीन आयफोन कमी जाडीचा आहे. वजनाला हलका आणि आकाराने लहान 
आहे.

आयफोन १२ च्या भारतातील किंमती
    आयफोन १२ मिनी
    ६४ जीबी ते २५६
    ६९९०० ते ८४९००
    आयफोन १२
    ६४ जीबी ते २५६ जीबी
    ७९९०० ते ९४९०० 
    आयफोन १२ प्रो 
१२८ जीबी ते ५१२ जीबी:
    ११९९०० ते १४९९०० 
    आयफोन १२ मॅक्स 
१२८ जीबी ते ५१२ जीबी
    १२९९०० ते १५९९०

संबंधित बातम्या