पाकिस्तानात हिंदूंसाठी मंदिरे बांधण्यास परवानगी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने जूनमध्ये राजधानी इस्लामाबादमधील मंदिराचे बांधकाम अचानक थांबविल्यानंतर इस्लामिक आयडिओलॉजी कौन्सिलतर्फे अल्पसंख्याक हिंदूंसाठी नवीन मंदिरे बांधण्यास बुधवारी मान्यता देण्यात आली.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने जूनमध्ये राजधानी इस्लामाबादमधील मंदिराचे बांधकाम अचानक थांबविल्यानंतर इस्लामिक आयडिओलॉजी कौन्सिलतर्फे अल्पसंख्याक हिंदूंसाठी नवीन मंदिरे बांधण्यास बुधवारी मान्यता देण्यात आली. इस्लामिक कायद्यानुसार त्यांना प्रार्थनेची परवानगी आहे. संसदेचे सदस्य असलेले एक प्रख्यात हिंदू नेते लाल मल्ही यांनी या निर्णयाचे कौतुक केले पण सरकारने खासगी मंदिरे बांधण्यासाठी सार्वजनिक निधी प्रत्यक्ष खर्च न करण्याची शिफारस इस्लामिक आयडिओलॉजी कौन्सिलने केली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने जूनमध्ये राजधानी इस्लामाबादमधील मंदिराचे बांधकाम अचानक थांबविले होते.

तणाव वाढवत काही अतिरेकींनी मंदिर बांधण्याचे काम रोखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. सार्वजनिक निधी या बांधकामासाठी वापरता येईल का याचा निर्णय घेण्यासाठी खान यांनी कौन्सिलकडे शिफारस केली होती. इम्रान खान यांनी मंदिराच्या बांधकामासाठी 600,000 डॅालर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. सार्वजनिक निधी या मंदिरांच्या बांधकामासाठी वापरता येईल का, याबाबत आधी साशंकता होती. तथापि, परिषदेच्या निर्णयामुळे हिंदू समाजाला योग्य वाटेल त्याप्रमाणे हा निधी वापरता येऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे. अल्पसंख्यांकांना समान हक्काचे आश्वासन देणाऱ्या इम्रान खान यांनी मंदिराच्या बांधकामाला परवानगी देण्यासाठी औपचारिक आदेश जारी करणे अपेक्षित आहे. इस्लामाबादमध्ये सध्या हिंदूंसाठी कोणतेही मंदिर कार्यरत नाही. राजधानीत एक प्राचीन मंदिर अस्तित्वात आहे, परंतु हल्ले होण्याच्या भीतीने हिंदू समुदाय या ठिकाणी जात नाही.
 

संबंधित बातम्या