Golden Fish: मौल्यावान मासा खराब समजून पाण्यात फेकला, अन् नंतर समजले...

Golden Fish Bass
Golden Fish Bass

Golden Fish Bass:अमेरिकेत(America) एका व्यक्तीचे अनवधानाने मोठे नुकसान झाले. वास्तविक, एक दुर्मिळ मासा(Rare Fish) त्या व्यक्तीच्या हातात सापडला परंतु तो आजारी असल्याचे समजून त्याने त्या माशाला परत पाण्यात सोडले. ही संपूर्ण घटना आरकंसॉ, अमेरिका येथिल आहे. येथे मासेमारी करणाऱ्या एका व्यक्तीला बास मासा(golden fish bass) सापडला. जीवशास्त्रज्ञ या माशाला अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानतात. जोश रॉजर नावाच्या एका व्यक्तीने हा बास मासा आपल्या जाळ्यात अरकंसॉच्या बीवर तलावात पकडला.( Arkansas fisherman caught a rare golden largemouth bass fish on Sunday)

या बास माशाचा रंग सोनेरी असतो. आरंकसॉ गेम आणि फिश कमिशनचे जीवशास्त्रज्ञ जॉन स्टीन यांच्या म्हणण्यानुसार, हा रंग त्याच्या अनुवांशिक प्रवृत्तीमुळे होते. त्याने सांगितले की या माशाचा रंग झांथोक्रोमिसममुळे बदलला होता, त्यामुळे तो सोनेरी रंगाऐवजी पिवळसर रंगाचा झाला होता. रोजेनला वाटले की हा मासा आजारी आहे म्हणून त्याने तो पुन्हा पाण्यात सोडून दिला.

फोटो शेअर केल्यानंतर चूक लक्षात आली
काही काळानंतर त्याने माशांचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले. फोटो पाहून लोकांच्या प्रतिक्रियेमुळे रॉजरला धक्काच बसला. त्यांना समजले की ही एक सामान्य गोष्ट नव्हती, हा एक दुर्मिळ मासा होता जो त्यांने स्वत:हून पाण्यात सोडला. त्यांच्या मते, या माशाचे वजन सुमारे एक किलो होते आणि त्याची लांबी सुमारे 16 इंच होती. अशा प्रकारचे दुर्मिळ प्राणी जीवशास्त्रज्ञ आणि छायाचित्रकारांचे मुख्य आकर्षण असते.

पहिल्यांदा बघितला पिवळा पेंग्विन 
यापूर्वी दक्षिण जॉर्जियाच्या दौर्‍यावर आलेल्या वन्यजीव छायाचित्रकाराला पिवळे पेंग्विन पाहून आश्चर्य वाटले होते. सहसा पेंग्विन काळ्या आणि पांढर्‍या रंगाचे असतात आणि त्यांच्या डोक्यावर आणि गळ्यावर पिवळ्या रंगाचे ठिपके असतात.

येव अ‍ॅडम्स नावाच्या छायाचित्रकाराने काढलेल्या छायाचित्रात काळा आणि पांढरा पेंग्विन घेऊन एक पिवळा पेंग्विन दिसला आहे. तो अंटार्क्टिका आणि दक्षिण अटलांटिक दरम्यान छायाचित्रण मोहिमेचे नेतृत्व करीत होता. त्याने काढलेल्या छायाचित्रांमधे पिवळा पेंग्विन पाण्यात तरंगताना दिसला होता.
येव अ‍ॅडम्स चा ग्रूप एका पेंग्विन कॉलनीला भेट देण्यासाठी दक्षिण जॉर्जियातील सॅलिसबरी प्लेन येथे थांबला. या वसाहतीत 1.2 लाख पेंग्विन होते. यातील एक पिवळा रंगाचा जीव येवसकडे येत असताना दिसला, ज्याचे त्याने फोटो काढले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com