उशिरा का होईना पाकिस्तानला सुचलं शहाणपण, लष्करप्रमुख बाजवा म्हणतात...

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 18 मार्च 2021

दहशतवाद, सीमेवरील घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करत शांतता भंग करणाऱ्या पाकिस्तानला आता शहाणपण सुचते आहे. कारण पाकिस्तान आता पुन्हा भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा विचार करताना दिसतो आहे. पाकिस्तान भूतकाळ विसरून भारताशी शांततेची बोलणी करण्यास तयार आहे, असे मत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी नुकतेच व्यक्त केले आहे.

दहशतवाद, सीमेवरील घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करत शांतता भंग करणाऱ्या पाकिस्तानला आता शहाणपण सुचते आहे. कारण पाकिस्तान आता पुन्हा भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा विचार करताना दिसतो आहे. पाकिस्तान भूतकाळ विसरून भारताशी शांततेची बोलणी करण्यास तयार आहे, असे मत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. मात्र शांतता प्रस्थापित करण्याची पाकिस्तानची भूमिका प्रामाणिक आहे की पाकिस्तानची नवी खेळी आहे हे आता येणारा काळच ठरवेल. 

इस्लामाबादमध्ये 'नॅशनल सिक्युरिटी डायलॉग' या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी, काश्मीरचा प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना भूतकाळ विसरून पुढे जाण्याची वेळ आली असल्याचे जनरल बाजवा यांनी यावेळी सांगितले. पाकिस्तानमधील 'डॉन' या वृत्तसंस्थेने या याबाबतची माहिती दिली असून, भारत आणि पाकिस्तान यांच्या मधील स्थिर संबंधच दक्षिण आणि मध्य आशियामधील संपर्क दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे बाजवा यांनी नमूद केल्याचे डॉनने म्हटले आहे.

VIDEO VIRAL: पाकिस्तानात हेलिकॉप्टरमधून केला नोटांचा वर्षाव

भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारले तर ते दोन्ही देशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतील, असे मत लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी व्यक्त केल्याचे समजते. मात्र पुन्हा काश्मीरचे रडगाणे गात काश्मीर हा मुद्दा वादाच्या केंद्रस्थानी असल्याचे बाजवा यांनी पुढे म्हटले आहे. व तसेच काश्मीर वाद शांततेने मिटल्याशिवाय भारतीय उपखंडात समन्वयाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नसल्याचे म्हणत, हीच गोष्ट समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात म्हटले. याशिवाय, इतिहासाला विसरून पुढे जाण्याची वेळ आली असल्याचे आपल्याला वाटते, असे बाजवा म्हणाले. आणि यापुढचा संवाद हा भारतावर अवलंबून असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. 

इतकेच नाही तर, भारताने देखील दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत करण्यासाठी वातावरण तयार करण्याची गरज असल्याचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी म्हटले आहे. तर यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सुद्धा या विषयावर बोलताना, पाकिस्तान आणि भारताचे संबंध सुधारण्यासाठी भारतालाच प्रयत्न करावे लागणार असल्याचे मत व्यक्त केले होते.

 

संबंधित बातम्या