
नासाने चंद्रावर पोहोचण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत. याला मिशन मून असे नाव देण्यात आले असून त्याचा उद्देश चंद्रावरील जीवनाचा शोध घेणे हा आहे. आता 50 वर्षांनंतर नासाने आर्टेमिस-1 मोहीम सुरू केली आहे. अनेक अपयशानंतर या मिशनला यश मिळाले आहे. आर्टेमिस-1 मोहिमेचे फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आता या रॉकेटचा एक व्हिडिओ नासाने शेअर केला आहे. ज्यामध्ये आपला ग्रह म्हणजेच पृथ्वी दिसत आहे.
नासाने शेअर केलेला व्हिडिओ
या मिशनच्या नावाने नासाने (NASA) स्वतःचे ट्विटर अकाउंट तयार केले आहे. या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये पृथ्वीचे अद्भुत फोटो टिपण्यात आले आहेत. हा व्हिडिओ (Video) शेअर करताना नासाने लिहिले की, मिशन मूनच्या दिशेने जाणाऱ्या यानाने आपल्या ग्रहाची हे अद्भुत फोटो टिपले आहेत. रॉकेटच्या मागे पृथ्वी दिसत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
आर्टेमिस मून मिशन म्हणजे काय?
या मिशनचा उद्देश मानवाला पुन्हा एकदा चंद्राच्या (Moon) धरतीवर उतरवण्याचा आहे. आर्टेमिस-1 ची रचना अशाच प्रकारे करण्यात आली आहे. यामध्ये मानवासारखे दिसणारे पुतळे पाठवण्यात आले आहेत. जर सर्व काही सुरळीत झाले, तर पुढच्या टप्प्यात मानव या अंतराळ यानात बसतील आणि पुन्हा एकदा चंद्राच्या भूमीवर पाउल ठेवतील.
हे जगातील पहिले अंतराळयान (Space) आहे जे सुमारे 4.50 लाख किमी अंतर कापणार आहे. या अंतराळयानाद्वारे नासा चंद्रावर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बारकावे तपासणार आहे. यासोबतच हे देखील पाहिले जाईल की जर एखादी व्यक्ती चंद्रावर उतरली तर तो तिथे किती काळ थांबेल आणि तो सुखरूप परत कसा येईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.