‘’कलम 370 भारताचा अंतर्गत मुद्दा’’, अखेर पाकिस्ताननं केलं मान्य

Article 370 is an internal issue of India Pakistan finally agreed
Article 370 is an internal issue of India Pakistan finally agreed

भारताच्या संसदेनं (Indian Parliament) ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू काश्मीर राज्याला (Jammu Kashmir) विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 (Artical 370) रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्या संदर्भात विधेयक देखील पारित करण्यात आलं होतं. मात्र तेव्हापासूनच पाकिस्तानकडून (Pakistan) भारताच्या निर्णयाविरोधात सतत आक्रमक भूमिका घेतली गेली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी (Shah Mahmood Qureshi) हे कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावरुन मोदी सरकारवर (Modi Government) कायमच आगपखड करताना दिसून आले. मात्र आता पहिल्यांदाच पाकिस्ताननं कलम 370 भारताची अंतर्गत बाब असल्याचे मान्य केलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखती दरम्यान ही भूमिका मांडली आहे. मात्र असं सागंताना त्यांनी कलम 35A आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं देखील नमूद केलं आहे. (Article 370 is an internal issue of India Pakistan finally agreed)

भारतीय संसदेनं कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विरोधकांनी मोदी सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांमध्ये टीकेची झोड उठवली होती. जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरची विभागणी लडाख आणि काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आली होती. त्यावरुन भारताचा सतत विरोध करत असणाऱ्या पाकिस्ताननं आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच भारत सरकार जम्मू काश्मीरच्या संदर्भात योग्य भूमिका घेत नाही तोपर्यंत भारताशी कोणत्याही प्रकारचा व्यापार करायचा नाही अशी भूमिका पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी घेतली होती. मात्र आता पाकिस्ताननं आपल्या भूमिकेच्या बाबतीत घुमजाव केला आहे.

शाह महमूद कुरेशी यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत कलम 370 आणि कलम 35A या दोन्ही कलमांविषयी पाकिस्तानची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘’कलम 370 हे माझ्या मते काही महत्त्वाचं नाही. मात्र कलम 35A पाकिस्तानसाठी महत्त्वाचं आहे. कारण या कलमाच्या आधारे ते काश्मीरचा भौगोलिक नकाशा बदलण्याचा प्रयत्न करु शकतात. जो आता भारत सरकार करत आहे. तो मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, आहे आणि राहणार आहे,’’ असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, कुरेशी यांनी कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील सुनावणी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. कलम 370 हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. जम्मू काश्मीरच्या नागरिकांनी म्हटलं होत की, तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं. काश्मीरचे नागरिक नाराज आहेत. कलम 370 हे प्रकरण भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील प्रलंबित आहे. काश्मीरच्या लोकांनी देखील त्याविरोधात आवाज उठवला आहे. भारत सरकारने कलम 35A आणि कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भारत सरकारनं हा निर्णय घेऊन कमावलं कमी मात्र गमावलं जास्त असं मानणारा मोठा वर्ग तिथे आहे,’’ असं कुरेशी म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद सोडवण्यासाठी चर्चा हा एकमेव पर्याय आहे, असं देखील कुरेशी यांनी यावेळी म्हटलं आहे. ‘’दोन्ही देशांकडे चर्चेशिवाय कोणताही पर्याय नाही. दोन्ही पण देश आजच्या काळात अणवस्त्र संपन्न आहेत. दोन्ही देशांमध्ये काहीच मुद्दे तणावाचे आहेत. ते येणाऱ्या काळात सोडवता येतील. त्यावर युध्द हा पर्याय नाही,’’ असं कुरेशी म्हणाले.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com