New Army Chief Of Pakistan: पुलवामाचा कट रचणाऱ्या भारताच्या 'शत्रू'ला पाकिस्तानने बनवले लष्करप्रमुख

Asim Munir New Army Chief Of Pakistan: पाकिस्तानने असीम मुनीर यांच्या रुपाने आपल्या लष्कराच्या नव्या प्रमुखाची निवड केली आहे.
Asim Munir
Asim MunirDainik Gomantak

New Army Chief Of Pakistan: पाकिस्तानने असीम मुनीर यांच्या रुपाने आपल्या लष्कराच्या नव्या प्रमुखाची निवड केली आहे. पाकिस्तानी सरकारच्या दृष्टिकोनातून लष्करप्रमुख पद हे सर्वात महत्त्वाचे आहे, कारण अप्रत्यक्षपणे बहुतांश निर्णय लष्कराच्या मुख्यालयातून घेतले गेले आहेत.

दरम्यान, पाकिस्तानच्या (Pakistan) लष्करप्रमुखाची निवड व्हावी आणि त्याच्यातून भारताचा दुवा निर्माण होऊ नये... असे होऊच शकत नाही. अशा परिस्थितीत असीम मुनीर यांचे भारताशी कोणत्या प्रकारचे संबंध आहेत, ते कोणत्या पार्श्वभूमीतून आले आहेत आणि त्यांनी आतापर्यंत कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते?

Asim Munir
Pakistan Army Chief: सय्यद असीम मुनीर बनले पाक लष्कराचे नवे जनरल

तसेच, असीम मुनीर यांचे नाव येताच लगेच लक्षात येतो तो पुलवामा हल्ला. या दहशतवादी हल्ल्यावेळी असीम मुनीर हे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख होते. विशेष म्हणजे, मुनीर यांना पुलवामाचा मास्टर माईंड म्हटले जात होते. त्यावेळचे आयएसआय प्रमुख मुनीर यांनी पडद्यामागून हल्ल्याची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार केल्याचे सांगितले जाते. पुलवामा हल्ल्यादरम्यान मुनीर पाकिस्तानच्या बाजूने निर्णय घेणार्‍या लष्करी पॅनेलचा ते एक महत्त्वाचा भाग होते.

दुसरीकडे, भारतविरोधी सुरक्षा धोरणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुनीर यांची भूमिका केवळ पुलवामापुरती मर्यादित नव्हती, तर मुनीर यांनी भारताने केलेल्या बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानी धोरणे आणि निर्णयांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही तीच वेळ होती, जेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) मुनीर यांच्यावर नाराज झाले आणि त्यांनी तात्काळ लष्करप्रमुख बाजवा यांच्याकरवी त्यांची आयएसआय प्रमुख पदावरुन हकालपट्टी केली होती.

Asim Munir
Pakistan And USA: पाकचा USA ला इशारा, 'भारत रशियाकडून तेल खरेदी करु शकतो तर...'

बाजवा यांनी एका मित्राला भेट दिली

पाकिस्तानचे पुढील लष्करप्रमुख असीम मुनीर हे बाजवा यांचे जवळचे मित्र मानले जातात. हा अधिकार सिद्ध करण्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, त्यांना लष्करप्रमुख पदासाठी नामनिर्देशित करणे. 2018 मध्ये बाजवा यांच्या सांगण्यावरुन मुनीर यांची पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. इतकेच नाही तर एक काळ असा होता की, बाजवा एक्स कॉर्प्समध्ये कमांडर म्हणून तैनात होते, त्यानंतर मुनीर तिथे ब्रिगेडियर म्हणून तैनात होते.

Asim Munir
Pakistan : महिला पत्रकाराच्या मृत्यूनंतर इम्रान खान यांनी थांबवला 'लाँग मार्च'; म्हणाले...

काश्मीर तज्ञ

मुनीर हे काश्मीरचे तज्ज्ञही मानले जातात. आयएसआयचे प्रमुख म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी मुनीर हे उत्तर क्षेत्राचे कमांडर आणि मिलिटरी इंटेलिजन्सचे डीजीही होते. जैश-ए-मोहम्मदने पुलवामा हल्ला करण्यापूर्वी मुनीर यांच्या मदतीने संपूर्ण योजना तयार केली होती, कारण त्यांना पुलवामा आणि त्याच्या आसपासच्या परिसराची चांगली माहिती होती.

भारताला धोका होता

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने थेट आणि स्पष्टपणे सांगितले होते की, 'भारत दहशतवादविरोधी मोहिमेपासून मागे हटणार नाही.' यावर मुनीर यांनी सांगितले की, 'भारताकडून एक क्षेपणास्त्र आले तर प्रत्युत्तर म्हणून आम्ही तीन क्षेपणास्त्रे डागू.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com