अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस करणार अंतराळवारी

jef.jpg
jef.jpg

जुलै महिन्यात अ‌ॅमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेजोस (Jeff Bezos) अंतराळ प्रवास करणार आहेत. ब्ल्यू ओरिजिन (Blue Origin) नावाची स्पेस एजन्सी (Space Agency) जेफ बेजोस यांनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून बेजोस यांनी अंतराळ पर्यटनाची घोषणा केली आहे. या कंपनीच्या स्पेसक्राप्टमधून ते अंतराळाचे दर्शन घेणार आहेत.या कंपनीकडून पाठवण्यात येणाऱ्या पहिल्या मानवसहित स्पेसक्राप्टमध्ये बेजोस असणार आहेत. बेजोस यांनी आपल्या स्पेसक्राप्टला (Spacecraft)  'एनएस-14' (NS-14) नाव दिलं आहे.  या स्पेसक्राप्टची यशस्वीरित्या चाचणी झाल्यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अंतराळात जाणारे जेफ बेजोस पहिले श्रीमंत व्यक्ती असणार आहेत. अ‌ॅमेझॉनचे  कार्यकारी पद सोडल्यानंतर ते 15 दिवसांनी अंतराळात जाणार आहेत. 5 जुलै रोजी जेफ बेजोस यांनी आपलं कार्यकारी पद सोडलं आहे. (Astronautics by Amazon founder Jeff Bezos)

कंपनीने चाचणी दरम्यान नव्या अपग्रेड आणि बूस्टर केलेल्या कॅप्सूलचे परिक्षण केले होते. या अपग्रेड वर्जनमध्ये प्रवाशांकरिता असणाऱ्या सुविधांची तपासणी करण्यात आली होती. या स्पेसक्राप्टमध्ये पुश-टू-टॉक सिस्टम, प्रत्येक सीटवर नवीन क्रू अलर्ट सिस्टम तसेच कॅप्सूलमध्ये आवाज कमी यावा यासाठी कुशन लाइनिंग, आद्रर्ता आणि थंडावा राहण्यासाठी अद्यावत यंत्रणा बसवण्यात आली आहे. न्यू शेपर्ड पूर्णत: ऑटोनॉमस सिस्टम आहे. जेफ बेजोस या प्रसावासामध्ये आपल्या भावासह अंतराळातील प्रवास करणार आहेत. ''मी मागील पाच वर्षापासून अंतराळामध्ये प्रवास करण्याचं स्वप्न पाहत होतो. मात्र अखेर 20 जुलै रोजी माझ्या भावासंह हा प्रवास करणार आहे. माझ्या अगदी जवळच्या मित्रासोबत अंतराळातील प्रवास असणार आहे'', असं त्यांनी सोशल मिडियावरील इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. या स्पेक्राप्टमधून अंतराळातील प्रवास हा केवळ 11 मिनिटाचा असणार आहे. या दरम्यान स्पेसक्राप्ट 100 किलोमीटर उंचीवर असणार आहे.

स्पेसक्राप्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 4 दिवसांचा अनुभव मिळणार आहे. यात 3 दिवसांचं प्री-प्लाईट प्रशिक्षण मिळणार आहे. टेक्सासमधील वेन हॉर्नमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाच्या वेळी सर्व सुविधा ब्ल्यू ओरिजिनकडून देण्यात येणार आहे. स्पेसक्राप्टमधील एका जागेची विक्री लिलाव पध्दतीने करण्यात येणार आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम ब्लू ओरिजिन फाऊंडेशनला देण्यात येणार आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून विज्ञान आणि गणित शिक्षणाला हातभार लावण्यात येणार आहे. बेजोस यांनी 2000 मध्ये ब्ल्यू ओरिजिन या कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर लगेच दोन वर्षांनी एलन मस्क (Alan Musk) यांनी एक्स कंपनीची स्थापना केली होती. 2020 या वर्षात बेजोस यांनी प्रत्येक सेंकादाला 1.81 लाख रुपये कमावेल आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jeff Bezos (@jeffbezos)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com