पंतप्रधान नरेंद्र मोदी परतताच बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले

पंतप्रधान नरेंद्र मोदी परतताच बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले
modi bangladesh.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा संपताच बांगलादेश मधील हिंदूं मंदिरांवर हल्ले झाले आहेत. पूर्व बांगलादेशात रविवारी कट्टर इस्लामिक गटाच्या  शेकडो लोकांकडून एकत्र येत हे हल्ले करण्यात आले आहेत. स्थानिक पत्रकार आणि पोलिसांनी माध्यमांना सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या भेटीपासूनच हिंसक निदर्शने सुरू झाली होती. पंतप्रधान मोदी बांगलादेशात (Bangladesh) होते तेव्हासुद्धा बर्‍याच ठिकाणी निषेधाच्या अनेक घटना घडत असल्याची माहिती समोर आली आहे. (Attacks on Hindu temples in Bangladesh soon after Prime Minister Modis return to India)                 

पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याविरूद्ध झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये कमीतकमी 10 लोक ठार झाले असल्याची माहिती मिळते आहे. नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या काही घटनांमध्ये  झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूमुळे हे आंदोलन आणखी चिघळले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या 50 व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्‍यावर दाखल झाले होते. यानंतर, दुसर्‍या दिवशी शनिवारी ते भारतात परतले. शनिवारी उशीरा पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे पोहोचले. नरेंद्र मोदींनी या दौ-यात बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांना 12 लाख कोरोना लसीची डोसही दिली आहे.

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे भारतात अल्पसंख्यांक समुदायासोबत भेदभाव करत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करणारे आंदोलक करत होते. यापूर्वी बांगलादेशची राजधानी ढाका (Dhaka) येथे शुक्रवारी 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. यावेळी अश्रुधुर आणि रबरी गोळ्यांनी पोलिसांनी निदर्शकांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता.  तसेच, शनिवारी हजारो इस्लामिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर निषेध करण्यासाठी चटगांव व ढाका येथे मोर्चा देखील काढला होता. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com