ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी 'या कारणासाठी' मागितली महिलेची माफी

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

ऑस्ट्रेलियामधील एका महिलेने ऑस्ट्रेलियाच्य़ा संसदेत आपल्यावर बलात्कार झाला आसल्याचा गंभीर आरोप केला आहे.

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियामधील एका महिलेने ऑस्ट्रेलियाच्य़ा संसदेत आपल्यावर बलात्कार झाला आसल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर लगेच पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनी त्या महिलेची माफी मागितली. तसेच त्यांनी सरकारी कामकाज कशापध्दतीने चालते यासंबंधीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पिडीत महिलेने 2019 मध्ये आपल्यावर संरक्षण मंत्रालयाच्या कार्यसलायात बलात्कार झाल्याचे सांगितले. बलात्कार करणारा आरोपी हा  सरकारी पक्षासाठी काम करत आसल्याचा आरोपही तिने केले आहेत

महिलेने ऑस्ट्रोलियामधील प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ''एप्रील महिन्यामध्ये आपण पोलिसांसोबत यासंबंधीची सगळी चर्चा केली होती. मात्र करिअरची चिंता आसल्याकारणाने मी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नव्हती.'' तर दुसरीकडे पोलिसांनी ''एप्रिल महिन्यात पिडीत महिलेबरोबर चर्चा झाली आसल्याची त्याचबरोबर तिने कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे.'' आपण संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्य़ांना याबाबत माहिती दिली होती. असही त्यांनी सांगितले. पिडीत महिलेने आरोप केला की, ''आपल्याला संरक्षण मत्रांलयाच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आणि यावेळी आपल्यावर बलात्कार झाला होता.'' असं तिने सांगितले.

प्रशांत महासागरातील वानुआटु बेटावर पून्हा 6.2 तीव्रतेचा भूकंप

दरम्यान रेनॉल्ड्स यांनी या महिलेने तक्रार केली असल्याचे सांगितले होते असं म्हटलं आहे. मात्र त्यांनी या महिलेलेला पोलिस तक्रार करु नये यासाठी दबाव टाकला होता तो ऐआरोप यावेळी त्यांनी फेटाळला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले, ''हे असं कोणत्याही परिस्थितीत व्हयंला नको होतं, मी यांसंबंधीची माफी मागत आहे. असं पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. ''कामाच्या ठिकाणी महिला जास्तीत जास्त सुरक्षित राहाव्यात यासाठी मी खात्री करत आहे.'' असंही त्यांनी सांगितले आहे. 

संबंधित बातम्या