"इज्राईल हा देश नसून आतंकवाद्यांचा बेसकॅम्प आहे"

Ayatollah Khomeini has said that Israel is not a country but a base camp for terrorists.
Ayatollah Khomeini has said that Israel is not a country but a base camp for terrorists.

इराणचे (Iran) ज्येष्ठ नेते अयातुल्लाह खामनेई (Ayatollah Khomeini) यांनी इज्राईल बद्दल गंभीर विधान केले आहे. खामनेई यांनी शुक्रवारी, इज्राईल (israel)  हा देश नव्हे तर दहशतवाद्यांचे लपण्याचे ठिकाण आहे. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ साजरा करण्यात आलेल्या कुड्स डे (जेरुसलेम डे) निमित्त खमनाई बोल्ट होते. यावेळी ते म्हणाले की, "इज्राईल हा एक देश नाही तर पॅलेस्टाईन आणि इतर मुस्लिम देशांविरूद्धच्या दहशतवाद्यांचे लपण्याचे ठिकाण आहे." एवढेच नाही तर मुस्लिम देशांनी इज्राईलविरोधात एकजूट करण्याचे आवाहनही खमनाई यांनी केले आहे.( Ayatollah Khomeini has said that Israel is not a country but a base camp for terrorists.)

इज्राईल सारख्या निरंकुश देशाविरूद्ध लढा देणे म्हणजे दहशतवाद (Terrorism) आणि अन्यायविरूद्ध लढाईसारखे आहे. इज्राईलशी लढा देणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.  असे कठोर मत खामनेई यांनी व्यक्त केले आहे. नुकताच इराणच्या परमाणू ठिकाणावर हल्ला झाला. तसेच एका मोठ्या इराणी वैज्ञानिकाही देखिळत्या झाली आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने हे आरोप केल्याचे समजते आहे. इराणमध्ये दरवर्षी कुड्स डे साजरा केला जातो. इराणमधील इस्लामिक क्रांतीपासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. यानिमित्ताने देशभरात कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असते, परंतु यावर्षी कोरोना संसर्गामुळे कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता.

दरम्यान, सर्व निर्बंध असूनही राजधानी तेहरानमध्ये कुड्स दिनानिमित्त मोठ्या संख्येने लोक जमा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या लोकांनी अमेरिका आणि इज्राईल चे झेंडे जाळले आणि दोन्ही देशांविरोधात घोषणाबाजीही केली. खामनाई म्हणाले की, ज्यू लोकांचे शासन आता हळूहळू संपुष्टात येत आहे आणि कोणीही हे रोखू शकणार नाही. युएईसह अनेक मुस्लिम देशांशी इज्राईल चे संबंध सुधारण्यावर देखील खामनेई यांनी यावेळी भाष्य केले आहे. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी पॅलेस्टाईनला संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले आणि मुस्लिम देशांना त्याचे समर्थन करण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com