Baba Vanga: रशिया आज तोडणार युक्रेनचा लचका, बाबा वेंगांचं भाकित ठरतयं खरं!

Baba Vanga On Third World War: रशिया आज (शुक्रवारी) युक्रेनच्या चार भागांवर औपचारिक ताबा घेणार आहे.
Baba Vanga Prediction on Vladimir Putin
Baba Vanga Prediction on Vladimir PutinDainik Gomantak

Baba Vanga Predictions: रशिया आज (शुक्रवारी) युक्रेनच्या चार भागांवर औपचारिक ताबा घेणार आहे. सार्वमत पार पडले आहे. युक्रेनच्या या 4 भागांवर ताबा मिळवल्यानंतरही रशिया थांबणार नाही. तो काही तरी मोठे करु शकतो, असे पाश्चात्य देशांने वाटत आहे.

दरम्यान, अशा परिस्थितीत अमेरिका (America) आणि रशियासह (Russia) पाश्चात्य देश आमनेसामने येऊ शकतात. मात्र, रशियन नागरिकांनी देश सोडावा, असे अमेरिकेने आधीच सांगितले आहे. दुसरीकडे, तिसरे महायुद्ध होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Baba Vanga Prediction on Vladimir Putin
Baba Vanga: किती वर्षात होणार जगाचा अंत? बाबा वेंगाच्या भाकितांनी पुन्हा उडवली झोप !

यातच, बल्गेरियाच्या भविष्यकर्त्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांनीही तिसरे महायुद्ध, व्लादिमीर पुतिन आणि रशियाबद्दल अनेक भाकिते केली होती, जी आता चर्चेली जात आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 7 महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनीही अनेकदा अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. चला तर मग जाणून घेऊया बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी तिसऱ्या महायुद्धाबाबत काय भाकीत केले होते?

तिसऱ्या महायुद्धाबद्दल बाबा वेंगा यांचे भाकीत

बाबा वेंगा यांनीही तिसऱ्या महायुद्धाबद्दल भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार रशिया ही जगातील एकमेव महासत्ता असेल. तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर केला जाईल. विशेष म्हणजे, रशिया-युक्रेन (Ukraine) युद्धादरम्यान पुतिन यांनी अनेक वेळा अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली आहे.

Baba Vanga Prediction on Vladimir Putin
Baba Vanga: किती वर्षात होणार जगाचा अंत? बाबा वेंगाच्या भाकितांनी पुन्हा उडवली झोप !

पुतिन बद्दल बाबा वेंगा यांचे भाकीत

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 'रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनतील. याशिवाय रशिया जगावर राज्य करेल.' बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत सर्व काही बर्फासारखे वितळेल असे सांगितले होते. फक्त एकच गोष्ट अस्पर्शित राहील आणि ती म्हणजे 'व्लादिमीर यांचा गौरव' आणि 'रशियाचा गौरव'. बाबा वेंगा यांनी वर्तवल्याप्रमाणे, रशियाला कोणीही रोखू शकणार नाही. रशिया 'लॉर्ड ऑफ द वर्ल्ड' बनेल.

Baba Vanga Prediction on Vladimir Putin
Baba Vanga: बाबा वेंगाच्या या भाकितांमुळे घाबरले जग, 2023 मध्ये असे काहीसे घडणार !

वयाच्या 12 व्या वर्षी बाबा वेंगा यांचे डोळे गेले

बाबा वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियामध्ये झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी एका अपघातात त्यांचे दोन्ही डोळे गेले. असे म्हणतात की, बाबा वेंगा स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हत्या, परंतु भविष्य पाहण्याची त्यांच्याकडे विशेष शक्ती होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com