सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या पंतप्रधानाचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

बहरीनच्या स्टेट न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील मायो क्लिनिकल रूग्णालयात आज सकाळी शेख खलीफा यांचे निधन झाले. 

मनामा- बहरीनचे पंतप्रधान खलीफा बिन सलमान अल खलीफा यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. रॉयल कोर्ट ऑफ बहरीनने पंतप्रधानांच्या निधनाची घोषणा केली आहे. 

बहरीनच्या स्टेट न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील मायो क्लिनिकल रूग्णालयात आज सकाळी शेख खलीफा यांचे निधन झाले. शेख खलीफा यांचे पार्थिव देशात आणल्यावर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या दरम्यान कमी संख्येने लोक अंत्य दर्शनासाठी सहभागी होणार असल्याचे सांगत त्यांनी अगदी जवळचे नातेवाईकच अंत्यसंस्कारांना हजर असतील असेही सांगितले आहे.    

1970 पासून होते पंतप्रधान 

शेख खलिफा यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1935 मध्ये झाला होता. ते बहरीनच्या शाही परिवारात जन्मले होते. त्यांनी 1970 नंतर बहरीनचे पंतप्रधानपद सांभाळले. १५ ऑगस्ट १९७१ला मिळालेल्या बहरीनला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या एक वर्षाआधी खलीफा यांनी पदाची शपथ घेतली होती. जगातील कोणत्याही देशातील पंतप्रधानांच्या तुलनेत ते सर्वाधिक काळ बहरीनच्या पंतप्रधान पदावर होते. 

 

संबंधित बातम्या