'घूमेंगे फिरेंगे ऐश करेंगे....', बॉसने दिली कर्मचाऱ्यांना स्पेशल ट्रीट

कोरोना काळात जगभरातील कंपन्यांमध्ये वर्क फॉर्म होमची प्रथा खूप लोकप्रिय होती.
Trip
TripDainik Gomantak

Australia: कोरोना काळात जगभरातील कंपन्यांमध्ये वर्क फॉर्म होमची प्रथा खूप लोकप्रिय होती. त्यानंतर हळूहळू जेव्हा कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाली तेव्हा लोक फिरायला जाऊ लागले. दरम्यान, अनेक कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठे औदार्य देखील दाखवले. असेच एक प्रकरण ऑस्ट्रेलियन कंपनीतून समोर आले आहे, जेव्हा एका मार्केटिंग कंपनीच्या बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांची अशी ट्रीप केली की सगळेच त्यांचे फॅन झाले.

वास्तविक, ही घटना ऑस्ट्रेलियातील (Australia) सिडनी शहरातील आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, एका मार्केटिंग कंपनीच्या बॉसने स्वत:च्या पैशाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बाली येथे ट्रीपची व्यवस्था केली. एवढेच नाही तर सुमारे दोन आठवडे चाललेल्या या ट्रीपमध्ये कर्मचाऱ्यांनी खूप आनंद लुटला, मात्र यावेळी काही कर्मचारी लॅपटॉपमध्ये व्यस्त असल्याचेही दिसून आले. या ट्रीपमधील फोटो कर्मचाऱ्यांनी स्वत:हा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Trip
या देशात खासगी Island विकणे आहे, 'मात्र...'

रिपोर्टनुसार, या ट्रिपमध्ये लक्झरी हॉटेल्स, उत्तम खाद्यपदार्थ, योगा आणि मॉर्निंग वॉकचाही समावेश होता. काही कर्मचाऱ्यांनी तर स्विमिंग पूलमध्ये मजाही लुटली. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, हायकिंग, क्वाड-बाईकिंग आणि योगाभ्यास यासारख्या मजेदार गोष्टी या ट्रीपच्या मुख्य केंद्रबिंदू होत्या. एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा हा एक उत्तम मार्ग होता.

ते पुढे म्हणाले की, 'कोरोना महामारीने (Corona Epidemic) आपल्याला प्रामुख्याने हे शिकवले की काम करण्याचे नवीन मार्ग आहेत. आता आपण कुठूनही काम करु शकतो. इतकेच नाही तर या ट्रीपमुळे विविध विभागातील सहकाऱ्यांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटून एकत्र काम करण्याची संधीही मिळाली.'

Trip
World Largest Temple: जगातील सर्वात मोठे मंदिर कुठेयं तुम्हाला माहितीये का?

कंपनीच्या एका विभाग प्रमुखाने सांगितले की, ''संपूर्ण एजन्सीसोबत काम करणे, संवाद साधणे आणि सहयोग करणे हा एक अद्भुत अनुभव होता. हा अनुभव न विसरणारा होता. आत्ता संपूर्ण टीम बाली, इंडोनेशियाहून (Indonesia) परतली आहे. विशेष म्हणजे, कर्मचारी त्यांचे स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com