पंतप्रधान मोदींना रक्षाबंधनाचा मॅसेज पाठवलेल्या बलोच महिलेचा कॅनडात संशयास्पद मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

बलुचिस्तान आंदोलनाचा सर्वात मोठा चेहरा करीमा बलोच या कॅनडामध्ये मृतावस्थेत आढळल्या आहेत. त्या आपल्या काही मित्रांच्या मदतीने पाकिस्तानातून पळून कॅनडामध्ये पोहोचल्या होत्या. त्या समाजमाध्यमे आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मसवर बलुचिस्तानच्या मुद्यांवर बोलत होत्या.

बलुचिस्तान आंदोलनाचा सर्वात मोठा चेहरा करीमा बलोच या कॅनडामध्ये मृतावस्थेत आढळल्या आहेत. त्या आपल्या काही मित्रांच्या मदतीने पाकिस्तानातून पळून कॅनडामध्ये पोहोचल्या होत्या. त्या समाजमाध्यमे आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मसवर बलुचिस्तानच्या मुद्यांवर बोलत होत्या. त्यांचा कॅनडाच्या हार्बर्ट मध्ये मृतदेह आढळला. त्यांचे पती हमाल हैदर आणि त्यांच्या भावाने त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे.
 
पंतप्रधान मोदींना पाठवला होता रक्षाबंधनाचा संदेश 
 बलुचिस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी करीमा संघर्ष करत होत्या. त्यांनी या मुद्यावर अनेकदा भारताकडून मदतही मागितली होती. २०१६ मध्ये रक्षाबंधनला त्य़ांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक व्हिडिओद्वारे संदेश पाठवला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, 'अनेक बांधव गायब आहेत, बलुचिस्तानमध्ये बहिणी अजूनही आपल्या भावाची घरी येण्यासाठी वाट बघत आहेत. ते कधीच परत येणार नाहीत आणि बहिणी कायमच वाट बघत बसतील असेही घडू शकते. मी आपल्याला एका भावाच्या नात्याने एक विनंती करते की, बलुचिस्तानमध्ये सुरू असणारा नरसंहार आणि वॉर गुन्ह्यांना जगाच्या पातळीवर मोठा मुद्दा करावा. आम्ही ही लढाई स्वत:च लढू मात्र या लढाईत आपण आमचा आवााज व्हावे अशी आमची इच्छा आहे.'    

दक्षिण पश्चिम आशियाचा बलुचिस्तान हा पाकिस्तानी प्रांत आहे. १९४७मध्ये तीन संस्थानांना पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सामील करण्यात आले होते. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमेंट एटली यांनी ५३५ संस्थानांना स्वतंत्र राहण्याची परवानगी दिली होती. मात्र, कलातचा राजा अहमद यार खान याने पाकिस्तानमध्ये सामील होण्यास नकार दिला होता. परंतु, असे होऊ शकले नाही. आणि येथूनच संघर्षाला सुरूवात झाली. सुरूवातीपासून बलूच माणसे स्वातंत्र्याची मागणी करत होते. पाकिस्तानने फक्त पंजाब आणि सिंध प्रांतात विकास केला अशी बलुचिस्तान समर्थकांची ओरड असते. बलुचीस्तान हे पाकिस्तानचा सर्वात गरीब प्रांत मानले जाते. पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तहेर संस्था त्यांच्या स्वातंत्र्याच्या मागणीला कायमच दाबत आली आहे.  
 

संबंधित बातम्या