Dhaka Blast: ढाकामध्ये भीषण विस्फोट, 16 जणांचा मृत्यू; 100 हून अधिक जखमी

बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका इमारतीत स्फोट झाल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार, या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Dhaka Blast
Dhaka BlastDainik Gomantak

Deadly blast at building in Bangladesh's Dhaka: बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका इमारतीत स्फोट झाल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार, या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

ढाका येथील गजबजलेल्या बाजारपेठेत मंगळवारी हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्फोट का झाला, त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आज दुपारी 4.50 च्या सुमारास हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस (Police) ठाण्याचे निरीक्षक बच्चू मिया यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

Dhaka Blast
Bangladesh Blast: बांग्लादेशातील ऑक्सिजन प्रकल्पामध्ये भीषण स्फोट; 6 जणांचा मृत्यू तर 30 जखमी

रुग्णालयातील आपत्कालीन युनिटमध्ये जखमींवर उपचार

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बहुतांश जखमींवर हॉस्पिटलच्या (Hospital) आपत्कालीन विभागात उपचार सुरु आहेत. ज्या इमारतीत स्फोट झाला त्या इमारतीच्या तळमजल्यावर सॅनिटरी उत्पादनांची अनेक दुकाने आहेत. त्याच्या शेजारी ब्रॅक बँकेची शाखाही आहे. स्फोटामुळे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बसचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

Dhaka Blast
Bangladesh President: 1971 च्या युद्धात सक्रिय सहभागी असणारे 'हे' होणार बांगलादेशचे नवे राष्ट्रपती

जखमी व्यक्तीने वेदनादायक दृश्य कथन केले

रक्ताने माखलेला शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने पत्रकारांना सांगितले की, तो स्फोटात जखमी झाला आहे. स्फोटामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि इमारतीच्या भिंतीलाही तडे गेल्याचे त्याने सांगितले. जखमी व्यक्तीने घटनेतील वेदनादायक दृश्य कथन केले.

तो म्हणाला की, 'लोक जमिनीवर पडले होते. जखमींमध्ये एकच गोंधळ उडाला. कसा तरी मी खिडकीतून उडी मारुन बाहेर पळत सुटलो.' चितगावच्या दक्षिणेकडील शहराजवळ शनिवारी ऑक्सिजन प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com