'या' इस्लामिक देशात मद्यविक्री वाढवण्यासाठी सरकारचं देतयं प्रोत्साहन

बांगलादेशात (Bangladesh) मद्यपान वाढत आहे.
Alcohol
AlcoholDainik Gomantak

बांगलादेशात मद्यपान वाढत आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये बांगलादेश सरकारने अल्कोहोल नियमांमध्ये मोठ्या बदलाला मंजुरी दिली. तेव्हापासून वाइन उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बांगलादेश हा जगातील अशा देशांपैकी एक आहे, जिथे अल्कोहोल (Alcohol) विक्रीची सरासरी कमी आहे. परंतु लवकरच ही परिस्थिती बदलू शकते. (Bangladesh has eased the rules for selling alcohol)

दरम्यान, बांगलादेशात (Bangladesh) दारुचे उत्पादन करणाऱ्या केअर्यू अँड कंपनी ( Bangladesh) या सरकारी कंपनीने फेब्रुवारीमध्येच उत्पादन वाढवण्याची तयारी सुरु केली. नियमात बदल करुन अधिक संख्येने बार उघडण्याची आणि रेस्टॉरंट्संना मद्यविक्रीची परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. केअर्यू अँड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद मोशर्रफ हुसैन यांनी NikEasia.com- या वेबसाइटशी बोलताना सांगितले की, 'आम्ही आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यास तयार आहोत. आमची विक्री मोठ्या प्रमाणात वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.'

Alcohol
इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; संपत्ती आणि उत्पन्नाची होणार चौकशी

दुसरीकडे, बांगलादेशात दारुबाबत जुने नियम 100 वर्षांहून अधिक काळ लागू होते. त्यांच्या हाताखाली दारुविक्रीवर कडेकोट बंदोबस्त होता. या कारणास्तव, फारच कमी रेस्टॉरंट्स (Restaurants) आणि बार ना दारु विकण्याची परवानगी होती.

तसेच, बांगलादेशच्या अंदाजे 1.25 अब्ज लोकसंख्येपैकी 90 टक्के मुस्लिम आहेत. बहुसंख्य मुस्लिम धार्मिक कारणास्तव दारु पिणे टाळतात. बांगलादेशात, पूर्वीच्या नियमांनुसार, केवळ त्या मुस्लिमांनाच दारु पिण्याची परवानगी होती, ज्यांना आरोग्याच्या कारणास्तव डॉक्टरांनी असा सल्ला दिला आहे.

Alcohol
इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; संपत्ती आणि उत्पन्नाची होणार चौकशी

जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, बांगलादेशात दरडोई दारुचा वापर वार्षिक फक्त 0.02 लिटर आहे. तर दक्षिण कोरियामध्ये हा वापर 9.7 लिटर आहे. निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, नवीन नियमांनुसारही प्रत्येकाला वाटेल तेव्हा दारु पिण्याची परवानगी मिळणार नाही. मात्र, जुन्या नियमांशी संबंधित काही गोंधळात टाकणाऱ्या बाबी आता दूर करण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक बार आणि रेस्टॉरंटना कायदेशीररित्या दारु विक्री करता येणार आहे.

Alcohol
इम्रान खान सरकार अडचणीत; विरोधक दाखल करणार अविश्वास प्रस्ताव 

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात परदेशी नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता नियमांमध्ये बदल करण्यात आले. अलिकडच्या वर्षांत पर्यटक म्हणून आणि चालू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम करण्यासाठी परदेशी लोकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. सरकारला पर्यटनाला अधिक चालना द्यायची आहे.

तसेच, ढाकास्थित एका रेस्टॉरंटचे व्यवस्थापक सिकंदर अली यांनी निक्काई एशिया या वेबसाइटला सांगितले की, 'जर परवाने मिळणे सोपे झाले तर दारुची विक्री नक्कीच वाढेल. दुसरीकडे, देशात अवैध दारुचा साठा वाढत आहे. एका अंदाजानुसार अवैध दारुचा वार्षिक व्यवसाय $190 दशलक्ष आहे. जाणकारांच्या मते, बांगलादेश सरकारचे उद्दिष्ट आता बेकायदेशीर दारु व्यवसायाला झटका देण्याचे आहे. मद्यविक्री कायदेशीर झाल्यास सरकारचा कर महसूल वाढेल.

सरकारी आकडेवारीनुसार, सध्या बांगलादेशात 85,000 पेक्षा जास्त लोकांकडे दारुचे परवाने आहेत. त्यापैकी बहुतांश परदेशी आणि गैर-मुस्लिम आहेत. आता परवाना मिळवणाऱ्या बांगलादेशी मुस्लिमांची संख्याही वाढेल अशी अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com