बांगलादेशकडे पाच महिने पुरेल इतकेच परकीय चलन

सरकार आणि बँक कठोर निर्णयाच्या भूमिकेत
sheikh Hasina
sheikh HasinaDainik Gomantak

जागतिक बाजारपेठेतील परिस्थितीचा बांगलादेशवर नकारात्मक परिणाम झाला असून त्याचा आयात खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे देशाचा परकीय चलनाचा साठा संपुष्टात येत आहे. त्यामूळे देशाला येणाऱ्या आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. देशात जेवढे परकीय चलन शिल्लक आहे, ते पुढील पाच महिन्यांसाठी आयातीचा खर्च भागवण्यासाठी वापरता येईल. अशावेळी बांगलादेश सरकार आणि केंद्रीय बँक कठोर निर्णय घेत आहेत.

बांगलादेशातील परकीय चलनाचा साठाही संपुष्टात येत असल्याची बातमी असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू, कच्चा माल आणि इंधन, माल वाहतूक इत्यादींच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे बांगलादेशवर वाईट परिणाम झाला आहे. जुलै ते मार्च या कालावधीत बांगलादेशच्या आयात खर्चात 44 टक्के वाढ झाली आहे.

sheikh Hasina
पाकिस्तानातील शीख बांधवांच्या हत्येबद्दल भारताने व्यक्त केला तीव्र निषेध

बांगलादेशच्या एका वृत्तानुसार, ज्या वेगाने बांगलादेशचा आयात खर्च वाढला आहे,त्यानुसार निर्यातीतून उत्पन्न वाढलेले नाही. त्यामुळे व्यापार तूट वाढून परकीय चलनाच्या साठ्यावर दबाव वाढला आहे.यातच गेल्या अनेक महिन्यांपासून व्यापार तूट वाढत चालली आहे. आणि बांगलादेश आयात खर्च भागवण्यासाठी देशात जमा झालेले डॉलर विकत आहे.

sheikh Hasina
'टॅटू क्रेझ', आईनेच बनवले मुलाच्या शरीरावर टॅटू, यूजर्स म्हणाले...''कसली आई आहेस तू''

बांगलादेशचा परकीय चलनाचा साठा कमी होत चालला आहे. देशात जेवढे परकीय चलन शिल्लक आहे, त्यातून पुढील पाच महिन्यांसाठीच आयातीचा खर्च भागवता येईल. जागतिक बाजारातील किमती आणखी वाढल्यास आणि परकीय चलनाचा साठा पाच महिन्यांपूर्वी संपुष्टात आल्यास बांगलादेशचा आयात खर्च आणखी वाढेल.

परकीय चलनाचा साठा कमी होत असताना बांगलादेशला अजूनही आशेचा किरण दिसतो आहे. बांगलादेशातील निर्यातीतून उत्पन्न वाढवण्याचा ट्रेंड कायम आहे. देशांतर्गत कापड व्यापार, कृषी उत्पादने, चामडे आणि चामड्याच्या उत्पादनांच्या निर्यातीतून बांगलादेशचे उत्पन्न चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-एप्रिलमध्ये USD 1 बिलियनवर पोहोचले आहे. त्याच वेळी, ताग आणि ताग उत्पादनांमधून निर्यात उत्पन्न देखील सुमारे एक डॉलर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com