...म्हणून बांगलादेशी नागरिक चिनी लोकांच्या विरोधात उतरले रस्त्यावर

शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे: बांगलादेशी नागरिक
Protest
Protest Dainik Gomantak

बांगलादेशातील पिरोजपूर जिल्ह्यातील मठबरिया येथे धरणाचे बांधकाम सुरू आहे. बांधकामात अडथळा आणल्याचा आरोप करून येथे काम करणाऱ्या चिनी लोकांनी स्थानिक रहिवाशांवर हल्ला केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. आरोप मागे घेण्याच्या मागणीसाठी लोकांनी मानवी साखळी तयार करून चीनचा निषेध केला. (Bangladeshi citizens protested against Chinese people)

Protest
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या डी-कंपनीवर कारवाई सुरूच; दोन गुंडांना अटक

बांगलादेशातील स्थानिक लोकांनी हे आरोप मागे घेण्यासाठी शांततापूर्ण रॅली काढून निदर्शने केली. स्थानिकांनी हल्लेखोरांचे वर्णन "आक्रमक चीनी लोक" असे केले. मानवी साखळीत उपस्थित लोकांनी सांगितले की, शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे, मात्र काही चिनी लोक देशात अनेक समस्या निर्माण करत आहेत. हे आरोप मागे न घेतल्यास यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे रॅलीतील नागरिकांनी सांगितले. त्यांनी चिनी दूतावासाला आपल्या अभियंते, नागरिक आणि कामगारांना समजावून सांगण्याचा इशारा दिला जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत.

Protest
एलन मस्कचे बेताल विधान! लोकांना नाटक कमी हवे होते, म्हणून ट्रम्प विरोधात जिंकले जो बायडेन

चिनी लोकांना कामापासून रोखले गेले
1 मे रोजी तेथील रहिवाशांनी या भागातील बांधकाम प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यास विरोध करत काम बंद पाडले. यानंतर तेथे काम करणाऱ्या काही चिनी लोकांची स्थानिक लोकांशी झटापट झाली. यानंतर स्थानिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com