'राहूल गांधींच्या भविष्यासाठी धोकादायक नसल्यानेच सोनियांनी मनमोहन यांना केले पंतप्रधान'

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपद देण्यासाठी सोनिया यांनी खूप विचार केला होता. 

नवी दिल्ली- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांचे पुस्तक 'अ प्रॉमिस्ड लँड'मध्ये काँग्रेस नेते राहूल गांधी आणि  अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे. आपल्या पुस्तकात त्यांनी असे म्हटले आहे की, 'सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवले कारण त्यांना मनमोहन सिंग यांच्याकडून राहूल यांना कोणताही धोका भविष्यात निर्माण होणार नाही याची खात्री होती.' मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपद देण्यासाठी सोनिया यांनी खूप विचार केला होता. 

राहूल यांच्या भविष्याकडे पाहून केले मनमोहन यांना पंतप्रधान- 

काही राजनैतिक विचारवंतांच्या मतानुसार सोनिया गांधीना हे माहिती होते की मनमोहन सिंग यांना कोणताही राजकीय पाठिंबा नसल्याने ते भविष्यात राहूल यांच्यासाठी धोक्याचे नसतील, असेही त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. सोनियांच्या विचारानुसार राहूल भविष्यात पक्षाची कमान सांभाळणार होते. यासाठी त्यांना पक्षातूनच एखाद्या मोठ्या नेत्याकडून धोका नसावा. यासाठी त्यांनी विचार विनिमय करून हे पद मनमोहन सिंग यांना बहाल केले होते. 

 सोनिया गांधी एक चतूर आणि कुशाग्र बुद्धीमत्ता असलेली महिला-   

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या एका डिनर पार्टीचा उल्लेखही ओबामा यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. या पार्टीत सोनिया गांधी आणि राहूल गांधी हेही सामील झाले होते. ओबामा म्हणतात की,  सोनिया गांधी यांचा बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर होता. पॉलिसी मॅटर वर बोलताना  मनमोहन सिंग यांच्याहून वेगळं मत असतानाही त्या  मोठ्या सावधगिरीने आपले मतभेद जाहीर करत होत्या. याशिवाय त्या चर्चा आपल्या मुलाच्या बाजुने वळवण्यात तरबेज होत्या.   

ओबामा यांनी पुढे लिहिले की,  'गप्पांच्या दरम्यान राहूल मध्ये मध्ये थांबून जात होते आणि माझ्या 2008 च्या निवडणुकीच्याबद्दल चर्चा करायला लागत होते. यात त्यांचे घाबरणे आणि त्यांच्याठायी असलेले विकृत गुणच जास्त दिसत होते. राहूल यांची योग्यता यावेळीच कळून येत होती.' 

संबंधित बातम्या