सावधान! आळशी लोकांना कोरोनाचा अधिक धोका, संशोधकांचा दावा

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 14 एप्रिल 2021

आळशी लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचं समोर आलं आहे. एका अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे सरकारबरोबर नागरिकांचीही चिंता वाढत आहे. परंतु एका अभ्यासातून आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. आता आळशीवृत्तीच कोरोना मृत्यूच कारण ठरु शकणार आहे. हो आळशी लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचं समोर आलं आहे. एका अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आळशी लोकांसाठी हो धोक्याचा इशाराच आहे. व्यायाम आणि शारिरीक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तीमंध्ये कोरोनाची लक्षण तीव्र असून, अशा लोकांचा कोरोनामुळे मृत्यूचा धोका जास्त संभवतो आहे. कोरोनाचा संसर्ग येण्याआगोदर दोन वर्षापासून ज्या व्यक्तींनी व्यायाम करणं सोडून दिलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या शारिरीक हालचाली कमी आहेत. त्यांना कोरोनानंतर रुग्णालयात दाखल केल्त्यांयानंतर थेट आयसीयूमध्येच भरती करावं लागत आहे, असं नव्या अभ्यासातून दिसून आलं आहे. ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकिय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिध्द करण्यात आले आहे. धुम्रपान, लठ्ठपणा या उच्च रक्तदाब यांच्या तुलनेत शारिरीक हालचाल न करणाऱ्यांना कोरोनाचा संसर्गाचा अधिक धोका आहे. असल्याचं निष्कर्षातून समोर आलं आहे. (Be careful Lazy people are at greater risk of corona researchers claim)

अमेरिकेच्या नौदलाची भारताला धमकी; काय आहे FONOP? जाणून घ्या

या संशोधनामध्ये 50 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना कोरोना संसर्गाचा आणि त्याचबरोबर कोरोनामुळे जीवीताचा अधिक धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र आता यापेक्षा शारिरीक हालचाल न केल्यामुळे कोरोना संसर्गातून मृत्यू ओढावण्याचा धोका जास्त असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे. ज्या व्यक्ती व्यायाम करत नव्हत्या. त्याचबरोबर शारिरीक हालचालीही करत नव्हत्या, अशा 48 हजार 440 लोकांमध्ये कोरोनाची लक्षण अधिक दिसून आली आहेत. यामध्ये काही लोकांना रुग्णालयामध्ये भरती करावं लागलं असून काहींचा मृत्यू झाला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये अमेरिकेत हा अभ्यास करण्य़ात आला होता.
 

संबंधित बातम्या