Brussels Railway Station: ब्रसेल्स रेल्वे स्टेशनवर 'अल्लाह हू अकबर' नारा देत प्रवाशांवर हल्ला

बेल्जियममधील ब्रसेल्स रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने 'अल्लाह हू अकबर' अशी घोषणा देत चाकूने लोकांवर हल्ला केला.
Watch Video| brussels
Watch Video| brusselsDainik Gomantak

Attack at Brussels Railway Station: बेल्जियममधील ब्रसेल्स रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे 18 आणि 19 जानेवारीच्या रात्री रेल्वे स्थानकावर एका मुस्लिम व्यक्तीने 'अल्ला हू अकबर' असा नारा देत अचानक चाकूने वार करण्यास सुरुवात केली, त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओही (Video) सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ब्रुसेल्स रेल्वे स्टेशनवर घडलेली घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये एक व्यक्ती अचानकपणे स्टेशनवर बसलेल्या प्रवाशांवर चाकूने गळ्यावर हल्ला करतांना दिसत आहे. या घटनेमुळे स्टेशनवर एकच गोंधळ उडाला आणि लोक आरडाओरड करू लागले.

  • फ्रेंच पोलीस अधिकाऱ्याने हल्लेखोराला पकडले

मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर पीडितेच्या चेहऱ्यावर आणि हातावर चाकूने वार करण्यापूर्वी स्टेशनवर मोठ्याने 'अल्लाह हू अकबर' नारे देत होता. दरम्यान, फ्रान्समधील एका पोलीस अधिकाऱ्याने, जो बहुधा ब्रुसेल्सला काही कामानिमित्त आला होता.

त्याने हल्लेखोराला जमिनीवर फेकले. फ्रेंच पोलीस अधिकाऱ्याने आपली ओळख जाहीर न करण्याची विनंती केली होती. व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) हल्लेखोर चाकू हातात धरताना स्पष्ट दिसत होते.

  • मला हल्ल्याच्या गांभीर्याचा अंदाज आला होता

व्हिडिओ (Video) पाहून असंही वाटत होतं की, हल्ल्याच्या वेळी कोणतीही हालचाल न झाल्याने आसपासच्या लोकांना लगेच काही समजलं नाही. मात्र, गोष्टी स्पष्ट होताच लोकांमध्ये घबराट पसरली.

पीडितेच्या गळ्यात वार केल्याचे पाहून त्याला धोका झाल्याचे फ्रेंच (France) व्यक्तीने सांगितले. हल्लेखोराने हल्ला चढवताच फ्रेंच नागरिकाने दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने हल्लेखोरावर मात केली. हल्लेखोराला नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी (Police) अटक केली. त्याचबरोबर हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com