बायडन प्रशासनाचा पाकिस्तानला झटका

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

''कोरोना, दहशतवाद, आणि जातीय हिंसाचाराची परिस्थिती लक्षात घेता पाकिस्तानात प्रवास करण्यासाठी जाणाऱ्या अमेरिकन नागरिकांना विचार करावा.'' असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले  आहे.

वाशिंग्टन: अमेरिकेत दहशतवादी कारवायांची शक्यता पाहता आपल्या देशातील नागरिकांना आशियामधील काही देशांमध्ये प्रवास टाळावा असा सल्ला अमेरिकन प्रशासनाने दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या ट्रव्हल अ‍ॅडव्हायजरी  लागू केली केली आहे. यात थेट म्हटले आहे की, पाकिस्तान, बांग्लादेश या देशांमध्ये प्रवास करण्यासाठी जाणाऱ्या अमेरिकन नागरिकांनी आपण घेत असलेल्या निर्णयाबद्दल पुन्हा विचार करावा असा सल्ला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानामध्येही अमेरिकन नागरिकांनी जावू नये असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी हल्ला; चार जवान जखमी

दक्षिण आशियामध्ये प्रवासासाठी जावू इच्छित असणाऱ्या अमेरिकन नागरिकांनी जरुर विचार करावा यासंबंधी बायडन प्रशासनाने इशारा दिला आहे. ''कोरोना, दहशतवाद, आणि जातीय हिंसाचाराची परिस्थिती लक्षात घेता पाकिस्तानात प्रवास करण्यासाठी जाणाऱ्या अमेरिकन नागरिकांना विचार करावा.'' असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले  आहे.

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रातांत वाढत्या अपहरणाच्या आणि दहशतवादाच्या घटना लक्षात घेता त्या भागात न जाण्याचा सल्ला अ‍ॅडव्हजरी सांगण्यात आले आहे. भारत पाकिस्तानमधील वाढता संघर्षाची परिस्थिती पाहता या देशांच्या सीमाभागात प्रवास करण्याचं टाळावं. या देशांच्या सीमाभागात मोठ्याप्रमाणात सैन्य आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या लष्करांमध्ये सतत संघर्षाची परिस्थिती असते. सीमाभागात वाढत्या गोळीबाराचाही थेट उल्लेख या अ‍ॅडव्हाजरीमध्ये केला आहे. ''आर्यलॅण्ड, ब्रिटन, तसेच युरोपियन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने औपचारिकरित्या बंदी  घातली आहे. या देशातील कोरोनाच्या स्थितीचा  विचार करता ही बंदी  घातली आहे''. तसेच दक्षिण आफ्रिकेचाही या बंदी घातलेल्या  देशांच्या  यादीत  समावेश आहे.

संबंधित बातम्या