'अमेरिका पुन्हा पॅरिस करारात सहभागी होणार' राष्ट्राध्यक्ष पद स्वीकारताच बायडन यांनी घेतला मोठा निर्णय

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

अमेरिकेचे  46  वे  राष्ट्राध्यक्ष  पद  स्वीकारताच  जो  बायडन  यांनी  अमेरिका  पुन्हा  पॅरिस  हवामानविषयक  करारात  सहभाग  घेणार आसल्याची मोठी घोषणा केली आहे.

वाशिंग्टन: अमेरिकेचे  46  वे  राष्ट्राध्यक्ष  पद  स्वीकारताच  जो  बायडन  यांनी  अमेरिका  पुन्हा  पॅरिस  हवामानविषयक  करारात  सहभाग  घेणार आसल्याची मोठी घोषणा केली आहे.अवघ्या काही तासात शपथविधीनंतर लगेच बायडन यांनी माजी राष्ट्रपती  डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय बदलला, ''या  कराराच्या माध्यमातून अमेरिकेने हवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या  प्रश्नांना  तोंड देणार असून या पूर्वी असे आम्ही कधीही केलेले नाही असे  प्रयत्न करणार आहोत'',असे बायडन यांनी यावेळी म्हटले.

पॅरिस  मध्ये  2015  मध्ये  हवामानविषयक  कराराला  मान्यता देण्यात आली. मात्र  अमेरिका  या करारातून  माघार घेत असल्याचे ट्रम्प यांनी 2017 मध्ये संयुक्त राष्ट्रांना कळवले होते.''अमेरिकन नागरिंकाच्या संरक्षणासाठी आम्ही या करारातून माघार घेत असल्याचे'', ट्रम्प यांनी  जाहीर केले होते.

मात्र अमेरिकन तज्ञांच्या मतानुसार अमेरिका या करारतून बाहेर पडल्यामुळे मोठा फटका बसणार असल्याचे म्हटले होते. मात्र नव्या राष्ट्राध्याक्षांनी ट्रम्प यांनी घेतलेल्या याच निर्णयाच्या संदर्भात नव्याने आदेश जारी केला आहे.

ट्रम्प  यांनी 2017 मध्ये घेतलेल्या निर्णयाला 5 नोव्हेंबर 2020 मध्ये तीन वर्ष पूर्ण झाली. त्याच  दिवशी  एबीसी या वृत्तवाहींनीने केलेल्या एका ट्वीटला उत्तर देताना बायडन म्हणाले, ''आजच्याच दिवशी ट्रम्प सरकारने करारातून माघार घेतली होती. मात्र येणाऱ्या 77 दिवसांमध्ये बायडन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका पुन्हा पॅरिस करारात सहभाग घेईल'' असे त्यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या