गलवान खोऱ्यात चीनला मोठा फटका

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

जून 2020  मध्ये गलवान  खोऱ्यातील  रक्तरंजित संघर्षात चीनचे  45  सैनिक ठार झाले होते, तर भारताचे 20  जवान शहीद झाले आहेत असे रशियन वृत्तसंस्था 'तास' ने म्हटले आहे.

नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यात सैन्य माघार घेण्याच्या प्रकियेवरुन वृत्त देताना रशियन वृत्तसंस्था ‘तास’ ने एक मोठा दावा केला आहे. ''जून 2020  मध्ये गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षात चीनचे 45 सैनिक ठार झाले होते तर भारताचे 20  जवान शहीद झाले आहेत'' तास ने म्हटले आहे. भारत आणि चीन यांच्यात पॅंगॉंग खोऱ्यातून सैन्य माघारी घेण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे.

चीनच्या संरक्षण मंत्रालयाने काल प्रथमच सैन्य माघार घेण्याची प्रक्रीया सुरु झाली असल्याचे सांगितले आहे. तसेच आज भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुध्दा सैन्य माघार घेण्याची प्रक्रीया सुरु झाल्याचे संसदेत सांगितले. चीनचे गलवान खोऱ्यात किती  सैन्य  ठार  झाले आहेत याची अद्यापही आकडेवारी जाहीर केलेली नाही. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने  चीनचे गलवान खोऱ्यात  40 अधिक सैन्य ठार झाले होते असे सांगितले आहे. भारत आणि चीनने  सात ते आठ  महिन्यांनतर गलवान खोऱ्यातील तणाव कमी करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलत आहेत.

भारत- चीन सीमावादाबाबत राजनाथ सिंह यांनी दिली महत्त्वाची माहीती

केंद्रीय  संरक्षणमंत्री  राजनाथ  सिंह  यांनी  संसदेत भारत चीन  सीमावादाबाबत  म्हटले की, ‘’भारत  आपल्या अखत्यारीत असणारी  एक  इंचभर  सुध्दा  भूमी  कोणाला  देणार नाही. पॅंगॉंग  सरोवराच्या  भागातून  सैन्य  मागे  घेण्याबाबत  चीन  बरोबर  सहमती झाली असल्य़ाची माहिती  संसदेला  दिली आहे. त्याचबरोबर  पॅंगॉग  सरोवराच्या भागातील  सैन्य  तैनाती  एकदम  कळीचा  मुद्दा  झाला आहे. चीनने  फिंगर  फोर  पर्यंत सैन्य  तैनात  केल्यामुळे  भारत  आणि  चीन  यांच्यातील  सीमावाद  जास्त  चिघळला आहे. चीनबरोबर सतत  चालू  असणाऱ्या  लष्करी  पातळीवरील चर्चेमुळे  पॅंगॉंग सरोवराच्या उत्तर आणि  पूर्व  किनाऱ्यावरुन  सैन्य  माघारीवर  सहमती  झाली  आहे. टप्प्याटप्प्य़ाने  आणि समन्वयाने  भारत  आणि  चीन  फॉरवर्ड  भागातून  सैन्य  मागे घेईल  असे  राजनाथ  सिंह  यांनी  यावेळी  सांगितले.

संबंधित बातम्या