आफ्रिकन देश काँगोमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, किमान 60 लोक ठार

आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
आफ्रिकन देश काँगोमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, किमान 60 लोक ठार
CongoDainik Gomantak

आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील विस्थापितांच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. ज्यामध्ये किमान 60 जणांचा मृत्यू झाला. धारदार शस्त्रांनी लोकांची हत्या करण्यात आली आहे. एका वृत्तसंस्थेने स्थानिक स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख आणि एका साक्षीदाराच्या हवाल्याने या प्रकरणाची माहिती दिली आहे. ही घटना देशातील अशांत इटुरी प्रांतातील आहे. जो देशाच्या पूर्व भागात आहे. येथे मे 2021 पासून सरकारने (Government) कडक निर्बंध लागू केले आहेत. (Africa Latest News)

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की हा प्रांत खनिजांनी समृद्ध आहे आणि सशस्त्र गट येथे मुक्तपणे फिरतात. त्यांचा सामना करण्यासाठी प्रांतात अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. या भागातील हिंसाचारावर लक्ष ठेवणाऱ्या किवू सिक्युरिटी ट्रॅकरने ट्विटरवर म्हटले आहे की, "जुगु प्रदेशातील प्लेन सावो येथे काल रात्री धारदार शस्त्रांनी किमान 40 नागरिकांचा मृत्यू झाला." अद्याप कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण केएसटीचे म्हणणे आहे की या हल्ल्यामागे कोडेको म्हणजेच स्थानिक बंडखोरांचा गट असल्याचे मानले जाते.

Congo
रशियाविरुद्ध युद्धाची तयारी करतायेत युक्रेनियन लोक, 'देशाच्या रक्षणासाठी जीवाचे रान करु'

ख्रिसमसच्या दिवशीही हल्ला झाला होता

काँगोमध्ये हा प्रकार पहिल्यांदाच घडत नाही, तर याआधीही ख्रिसमसच्या वेळी लोकांवर हल्ले झाले होते. त्यानंतर एका हल्लेखोराने रेस्टॉरंटला लक्ष्य केले. ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. बॉम्बस्फोटानंतर जोरदार गोळीबारही झाला. त्यामुळे उपस्थित लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले. हा हल्ला उत्तर किवू प्रांतात झाला. प्रांताच्या गव्हर्नरचे प्रवक्ते एकेंगे सिल्वेन यांनी नंतर सांगितले की जेव्हा सुरक्षा दलांनी हल्लेखोराला गर्दीतून जाण्यापासून रोखले तेव्हा त्याने स्वतःला उडवले.

या भागात आयएसचे दहशतवादी सक्रिय आहेत

उत्तर किवू हे काँगोचे एक क्षेत्र आहे, जिथे इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना खूप सक्रिय आहे. याशिवाय देशाच्या इतर भागातही असे हल्ले होतात. देशात बंडखोरांचे अनेक गट आहेत, जे नागरिकांवर हल्ले करतात. त्यांना तोंड देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, पण सरकारचे प्रयत्न पुरेसे नाहीत, हे अशा हल्ल्यांवरून स्पष्ट होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com