Pakistan: ''दहशतवाद्यांशी लढण्याची हिम्मत आमच्यात नाही'', PAK ने रशियासमोर केले कबूल

Pakistan Vs TTP: पाकिस्तानने इतक्या लवकर दहशतवाद्यांसमोर कसे गुडघे टेकले आणि आता अफगाणिस्तानवर त्याचे काय मत आहे, ते जाणून घ्या...
Terrorists
TerroristsDainik Gomantak

Pakistan Vs TTP: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकाटाचाही सामना करत आहे. यातच आता, दहशतवाद्यांशी लढण्याची हिम्मत आपल्यात नसल्याचे पाकिस्तानने प्रथमच रशियासमोर जाहीरपणे कबूल केले आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण आश्चर्यचकित होऊ नका... कारण खुद्द पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी स्वतःहून हे सांगितले आहे.

अखेर, पाकिस्तानने इतक्या लवकर दहशतवाद्यांसमोर कसे गुडघे टेकले आणि आता अफगाणिस्तानवर त्याचे काय मत आहे, ते जाणून घ्या...

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी म्हटले की, 'आमचे सरकार दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी (Terrorists) स्वबळावर लढू शकणार नाही.' अफगाणिस्तानचे नवे सरकारही या दहशतवाद्यांशी एकट्याने लढून यशस्वी होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

Terrorists
Pakistan-Russia: 'ऐसा कोई सगा नही...', PAK कडून फसवणूक होऊनही रशियाने उचलले हे पाऊल

झरदारी पुढे म्हणाले की, 'अफगाणिस्तान सरकार स्वबळावर दहशतवाद्यांशी लढू शकेल यावर माझा विश्वास नाही. पाकिस्तानसाठीही (Pakistan) मी म्हणेन की आम्ही एकटे दहशतवाद्यांशी लढू शकत नाही.' देशाचे कायदे आणि संविधानाचा आदर न करणाऱ्या दहशतवादी संघटनांशी पाकिस्तान सरकार कोणतीही चर्चा करणार नाही, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com