
मायक्रोसाॅफ्टचे सहसंचालक बिल गेट्स भारत दौऱ्यावर आहेत. अलिकडेच त्यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा, सध्याचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांची भेट घेतली आहे. त्याआधी ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, आरबीआरय गव्हर्नर शक्तिकांत दास आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांची भेट घेतली होती.
रतन टाटा आणि बिल गेट्स दोघेही व्यावसायिक क्षेत्रात सर्वोच्च पदावर आहेत. पण त्याचबरोबर जगभरात परोपकार करण्यातही ते आघाडीवर असतात. दोघांच्या भेटीदरम्यान आरोग्य, निदान आणि न्यूट्रीशियन क्षेत्रातील आपल्या संयुक्त प्रयत्नांना अधिक मजबूत करण्यासंदर्भात चर्चा झाल्या आहेत. गेट्स फाऊंडेशन इंडियाने यासंदर्भात ट्विट केले आहे. ट्विटमध्ये फाऊंडेशनने सांगितले की, आम्ही एकत्र काम करण्यास तत्पर आहोत.
सचिन तेंडूलकरने शेअर केला फोटो
बिल गेट्सने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची भेट घेतली आहे. सचिनने ट्विटवर गेट्स यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो (Photo) ट्विटरवर पोस्ट केले आहेत. या भेटीदरम्यान सचिनची बायको अंजलीही उपस्थित होती. सचिनने ट्विट करत लिहिले की, आपण सर्वच जीवनात विद्यार्थी आहोत. लहान मुलांच्या आरोग्य सेवेसह ज्या योजनेसाठी आमचे फाऊंडेशन काम करते त्यासंदर्भात नवा दृष्टीकोन शिकण्याची संधी बिल गेट्स यांच्या भेटीतून मिळाला.
गेट्स म्हणाले...
आनंद महिंद्रा यांनी बिल गेट्ससोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांच्या भेटीबद्दलही सांगितले आहे. पोस्टमध्ये बिल गेट्स आनंद महिंद्रा यांना त्यांची काही पुस्तके भेट देताना दिसत आहेत.
बिल गेट्स यांनी पुस्तकात एक सुंदर संदेशही शेअर केला आहे. बिल गेट्सने लिहिले, 'आनंद, वर्गमित्रासाठी शुभेच्छा.' बिल गेट्स आणि आनंद महिंद्रा हार्वर्ड विद्यापीठात एकत्र शिकायचे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.