'वन चायना पॉलिसी' रद्द करण्यासाठी अमेरिकन संसदेत मांडण्यात आले विधेयक

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

अमेरिकी खासदार टॉम टिफनी आणि स्कॉट फेरी यांनी हे विधेयक मांडलं आहे.

वॉशिंग्टन : चीनद्वारा राबवण्यात येत असलेली वन चायना पॉलिसी रद्द करण्यात यावी यासाठी अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षातील दोन सदस्यांनी अमेरिकेतील प्रतिनिधीगृहात विधेयक मांडले आहे. या विधेयकात अमेरिकेचे नव्याने तैवानसोबत राजनितीक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि चीन सरकारद्वारा राबवण्यात आलेली वन चायना पॉलिसी रद्द करण्य़ात यावी याचा उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिकी खासदार टॉम टिफनी आणि स्कॉट फेरी यांनी ही विधेयक मांडलं आहे. बायडन प्रशासनाद्वारा तैवानला अंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन देणे, तसेच अमेरिका आणि तैवान यांच्यात मुक्त व्यापार वाढवण्यासाठी ताइपे बरोबर वार्तालाप करण्याची अपील त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

मोठी बातमी: फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींना तीन वर्षांची शिक्षा

टिफनी म्हणाले, ‘’मागील 40 वर्षात अमेरिकेच्या रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक पक्षांच्या दोन्ही राष्ट्राध्यांक्षांनी बिजिंगच्या खोट्या प्रचाराचा प्रत्येक वेळा नामोउल्लेख केला आहे. तैवान हा साम्यवादी चीनचा हिस्सा आहे. मात्र वास्तव याच्या पूर्णपणे उलट आहे. या जुन्या झालेल्य़ा राजनितीला बदलणे आवश्यक आहे.’’

1979 मध्ये अमेरिकेचे तैवानबरोबर सामान्य राजनैतिक संबंध राहिले आहेत. मात्र तात्कलिक राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी तैवानबरोबर असणारे राजनैतिक संबंध अचानक थांबवून चीनशासित साम्यवादी शासनाला मान्यता दिली होती. चीन तैवानला विद्रोही प्रांत मानतो. आणि तैवानला नव्याने चीनमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
 

संबंधित बातम्या