जपान करणार तब्बल एक लाखापेक्षा जास्त कोंबड्यांची कत्तल !

देशाच्या ईशान्येकडील पोल्ट्री फार्ममध्ये "अत्यंत धोकादायक एव्हीयन इन्फ्लूएंझा" (Avian influenza) च्या एका प्रकरणाची पुष्टी झाली आहे.
जपान करणार तब्बल एक लाखापेक्षा जास्त कोंबड्यांची कत्तल !
HensDainik Gomantak

जगभरात कोरोना महामारीने (Corona) थैमान घातले आहे. सध्या लोक कोरोनाशी झुंज देत आहेत. दरम्यान, युरोपमध्ये कोरोना व्हायरसनंतर आता आणखी एका नव्या व्हायरसने दस्तक दिली आहे. यामुळे ब्रिटनमध्ये (Britain) नवी समस्या निर्माण झाली आहे. मध्य इंग्लंडमधील (England) पोल्ट्री युनिटमध्ये अत्यंत धोकादायक H5 बर्ड फ्लूचे (H5 bird flu) रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. देशाच्या कृषी मंत्रालयाने सोमवारी याची पुष्टी केली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हे सर्व संक्रमित पक्षी वॉरविकशायरमधील (Warwickshire) अल्सेस्टरजवळील (Alcester) पोल्ट्री फार्ममध्ये आहेत. संसर्ग टाळण्यासाठी हे सर्व पक्षी मारण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, जपानने (Japan) 2021 च्या हिवाळी हंगामात बर्ड फ्लूचा पहिला उद्रेक वाढू लागला आहे. देशाच्या ईशान्येकडील पोल्ट्री फार्ममध्ये "अत्यंत धोकादायक एव्हीयन इन्फ्लूएंझा" (Avian influenza) च्या एका प्रकरणाची पुष्टी झाली आहे.

अहवालानुसार, फार्मवर 143,000 कोंबड्यांची कत्तल करण्यात येणार आहे. स्थानिक पशुधन स्वच्छता केंद्राकडून शेतात अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल मिळाल्यानंतर, प्रीफेक्चरने मदतीसाठी स्व-संरक्षण दलाच्या सैनिकांना पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे. बर्ड फ्लूच्या चाचणीमधून काही मृत पक्ष्यांमध्ये पॉझिटिव्ह परिणाम दर्शविल्यानंतर, प्रीफेक्चरल सरकारला अनुवांशिक चाचणीद्वारे आढळून आले की, हा विषाणू अत्यंत धोकादायक आहे.

 Hens
कोरोना महामारीनंतर 'या' विषाणूने युरोपमध्ये केला शिरकाव

"जपानमधील सध्याच्या परिस्थितीनुसार, कोंबडीचे मांस किंवा अंडी खाल्ल्याने एव्हीयन इन्फ्लूएंझाचा प्रसार मानवांमध्ये होण्याची शक्यता आहे," यूटर्स यांनी कृषी मंत्रालयाला सांगितले.

अहवालानुसार, सोमवार ते मंगळवार दरम्यान सुमारे 190 पक्षी शेतात मरण पावले असून त्यापैकी 12 पक्षी विषाणूने ग्रस्त सापडले आहेत. बाधित सुविधेच्या 10 किमीच्या परिघातील सहा फार्मला त्यांच्या कोंबड्या आणि अंडी हलवण्यास सरकारने बंदी घातली होती.

 Hens
उत्तर कोरिया नंतर 'या' आशियाई देशाने एकही कोरोना रुग्ण नसल्याचा केला दावा

परंतु या वर्षी चीनमध्ये बर्ड फ्लूची लागण झालेल्या लोकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने आरोग्य तज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषत: जग कोरोना महामारीच्या साथीतून सावरत असताना दिसत आहे. चीनने 2021 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडे H5N6 उपप्रकार एव्हीयन इन्फ्लूएंझासह 21 मानवी संसर्गाची नोंद केली आहे. गेल्या वर्षी फक्त पाचच्या तुलनेत, सहा मृत्यू आणि इतर अनेकजण गंभीर आजारी आहेत. बर्ड फ्लूचा उद्रेक युरोपमध्येही अलीकडच्या काही दिवसांत आणि आठवड्यांत नोंदवला गेला आहे, पोलंडमधील शेतात संसर्गाची नवीनतम ठिकाणे आहेत, ज्यात एकूण 650,000 पोल्ट्री आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.