दहशतवादी संघटना बोको हरामकडून नायजेरियात ४० शेतकऱ्यांची हत्या

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

बोको हराम या दहशतवादी संघटनेने नायजेरियाच्या बोर्नो राज्यात ४० शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना ठार मारले. या राज्यात १३ वर्षांनंतर प्रथमच निवडणूक प्रक्रिया सुरु असून परवा मतदानाच्या दिवशीच बोको हरामच्या दहशतवाद्यांनी एका गावातील शेतकऱ्यांवर हल्ला करत त्यांना मारले. 

मैदगुरी : बोको हराम या दहशतवादी संघटनेने नायजेरियाच्या बोर्नो राज्यात ४० शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना ठार मारले. या राज्यात १३ वर्षांनंतर प्रथमच निवडणूक प्रक्रिया सुरु असून परवा मतदानाच्या दिवशीच बोको हरामच्या दहशतवाद्यांनी एका गावातील शेतकऱ्यांवर हल्ला करत त्यांना मारले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोको हरामच्या एक दहशतवादी आधी संबंधित गावात आला होता. त्याने शेतकऱ्यांना रायफलचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैसे घेतले आणि स्वत:साठी जेवणही बनवायला सांगितले. दहशतवादी गाफील असताना शेतकऱ्यांनी त्याला बांधून ठेवले आणि त्याची रायफलही काढून घेतली. या दहशतवाद्याला सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले आणि संरक्षणाची मागणी केली. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. बोको हराम संघटनेने शेतकऱ्यांचा बदला घेण्यासाठी गावावर हल्ला केला.

 

त्यांनी ४० ते ६० शेतकऱ्यांना एका ठिकाणी जमा करत त्यांच्यावर गोळीबार केला. या शेतकऱ्यांमध्ये काही मच्छिमारांचाही समावेश होता. जाताना त्यांनी या शेतकऱ्यांची शेतेही जाळून टाकली. नायजेरियाचे अध्यक्ष महंमदू बुहारी यांनी या हत्याकांडाचा निषेध केला आहे. दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी सैनिकांना सर्व ते अधिकार दिले असल्याचेही बुहारी म्हणाले.

संबंधित बातम्या