पाकिस्तानातील कराचीमध्ये बॉम्बस्फोट, 3 ठार 13 जखमी

बॉम्बस्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या तेराहून अधिक आहे.
bomb blast in Pakistan
bomb blast in PakistanDainik Gomantak

Bomb blast in Karachi: पाकिस्तानच्या कराचीमध्ये रात्री उशिरा झालेल्या बॉम्बस्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्फोट एवढा जोरदार होता की त्याचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू आला आणि आजूबाजूला उभी असलेली वाहने उद्ध्वस्त झाली. कराचीच्या सदर भागात हा स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी बाजारपेठेत गर्दी असल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता.

bomb blast in Pakistan
शाहबाज सरकार भारतापुढे झुकले! पाकिस्तानी संतप्त

प्राथमिक माहितीनुसार या बॉम्बस्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या तेराहून अधिक आहे. बॉम्बस्फोटानंतर सर्वत्र विध्वंसाच्या खुणा दिसत होत्या. अनेक वाहनांचेही नुकसान झाले होते. त्याचबरोबर स्फोटामुळे आजूबाजूच्या हॉटेल आणि घरांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डस्टबिनशेजारी उभ्या असलेल्या एका सायकलमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉम्बमध्ये 2 किलो स्फोटकांचा वापर

या बॉम्बस्फोटात सुमारे दोन किलो स्फोटके आणि सुमारे अर्धा किलो बॉल बेअरिंगचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोट टायमरने करण्यात आला. त्याच वेळी, सिंध आणि बलुचिस्तानच्या फुटीरतावादी गटांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कराची पोलिस याला दहशतवादी हल्ला म्हणत आहेत.

bomb blast in Pakistan
Sri Lanka Crisis: रानिल विक्रमसिंघे बनले नवे पंतप्रधान

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या शहराचे केंद्र असलेले कराची, जेथे स्फोट झाला त्या घटनास्थळावरून लोकांना हटवण्यात आले आहे. . त्यामुळे येथे असलेली गर्दी कमी झाली आहे. स्फोच ज्या भागात झाला त्या भागाला डाउनटाउन म्हणतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com