इंग्लंडमध्ये झाला चक्क दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा स्फोट; व्हिडिओ व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

इंग्लंडमधील एक्सेटर सिटीमधून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. तब्बल आठ दशकांनंतर दुसऱ्या महायुद्धातील एका बॉम्बचा स्फोट झाला आहे.

एक्सेटर : जगात आजही दुसरे महायुद्ध भयावह त्याच्या आठवणींमुळे स्मरणात आहे. यावेळी दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी बॉम्बने एकमेकांच्या ताब्यात घेतलेल्या जागांवर हल्ले केले होते. या सगळ्या नकोशा आठवणींदरम्यानच  इंग्लंडमधील एक्सेटर सिटीमधून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. तब्बल आठ दशकांनंतर दुसऱ्या महायुद्धातील एका बॉम्बचा स्फोट झाला आहे. हा बॉम्ब असल्याचे निष्पन्न होताच, 2600 लोकांचे शहरातून स्थलांतर करण्यात आले. 

म्यानमारमध्ये आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट गोळीबार; 18 जण ठार, कित्येक जखमी

यानंतर, बॉम्ब डिफ्युज करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर रिमोट कंट्रोलच्या मदतीने बॉम्ब उडवला गेला. बॉम्ब फुटल्यानंतर संपूर्ण आकाश धुराने व्यापले होते. हे दृश्य पाहिल्यावर  लोक भीतीने थरथर कापू लागले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये हा विनाशकारी बॉम्ब किती धोकादायक होता याचा अंदाज येतो.  लोक या बॉम्बबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा करत आहेत. स्फोट झालेल्या या बॉम्बचे आवाज अनेक मैल दूरपर्यंत ऐकू येत होते. मीडिया रिपोर्टनुसार रॉयल नेव्ही बॉम्ब डिस्पोजल टीम्स शुक्रवारी सकाळी 9 वाजता एक्सेटर युनिव्हर्सिटीजवळील ग्लेनथ्रॉन रोडवर पोहोचली.

मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती 

यासाठी शनिवारी रात्रभर डिस्पोजल ऑपरेशन करण्यात आले. यानंतर, संपूर्ण शहर  रिकामे केले गेले, जेणेकरुन डिव्हाइसची तपासणी केली जाऊन, त्याला सुरक्षितपणे दुसर्‍या ठिकाणी हलविले जाऊ शकेल. लोकांच्या सुरक्षेचा विचार करून पोलिसांनी 400 मीटरचे वर्तुळ बनवून आजूबाजूचे रस्ते बंद केले. एका निवेदनात म्हटले आहे की, “पोलिसांना आशा होती की हे काम एका दिवसात पूर्ण होईल, लोकांना असेही सांगितले गेले होते की सैन्य, पोलिस त्यांच्या सुरक्षेसाठी काम करत आहे."

संबंधित बातम्या