Afghanistan: काबूलसह 3 शहरांत बॉम्बस्फोट, इस्लामिक स्टेटने स्वीकारली जबाबदारी

अफगाणिस्तान (Afghanistan) पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरले.
Afghanistan
AfghanistanDainik Gomantak

अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरले. देशाच्या तीन वेगवेगळ्या भागात तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. काबूल, मजार शरीफ आणि कुंदुझ इथे हे स्फोट झाले आहेत. मजार शरीफमधील शिया मशिदीत स्फोट झाला. मजार-ए शरीफमध्ये झालेल्या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 40 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. इस्लामिक स्टेटने मजार-ए शरीफ मशिदीत झालेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. काबूलमध्ये रस्त्याच्या कडेला स्फोटही झाला आहे. काबूल पोलिसांच्या प्रवक्त्याने स्फोटात दोन मुले जखमी झाल्याची पुष्टी केली. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. (Bombings in 3 cities including Kabul Islamic State claims responsibility)

Afghanistan
Afghanistan: काबूलमधील शाळेत तीन स्फोट- अहवाल

दरम्यान, मंगळवारी अफगाणिस्तानातील (Afghanistan) काबूलमध्ये बॉम्बस्फोटांद्वारे शैक्षणिक संस्थांना लक्ष्य करण्यात आले. या स्फोटांमध्ये सात मुले जखमी झाल्याचे वृत्त आहे. अब्दुल रहीम शहीद हायस्कूलजवळ आणि काबूलजवळील दश्त-ए-बरची येथील एका शैक्षणिक केंद्रात हे स्फोट झाले. यावेळी शाळांमध्ये परीक्षा सुरु होत्या. या स्फोटांची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. यापूर्वी या भागात झालेल्या हल्ल्यांमध्ये इस्लामिक स्टेटचे नाव समोर आले होते.

तसेच, एप्रिलच्या सुरुवातीला काबूलच्या (Kabul) सर्वात मोठ्या मशिदीत दुपारच्या नमाजाच्या वेळी हॅन्डबॉम्ब फेकण्यात आला होता. या स्फोटात साधारण सहा जण जखमी झाले. जुन्या काबूल शहराच्या मध्यभागी असलेल्या 18 व्या शतकातील पुल-ए-खिश्ती मशिदीवर ग्रेनेड फेकण्यात आले. गेल्या वर्षी, जेव्हा तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतली तेव्हा मे महिन्यात काबूलमधील एका शाळेबाहेर दोन स्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 60 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला होता.

Afghanistan
Blast in Afghanistan: हेरात शहरात भीषण बॉम्बस्फोट; 12 ठार, 25 जण जखमी

शिवाय, 3 एप्रिल रोजीही काबुल सेंट्रल भागात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये 59 लोक जखमी झाले होते. काबूलमधील आपत्कालीन रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात एक मृतदेह आणण्यात आला असून 59 जणांवर उपचार करण्यात आले त्यापैकी 30 जखमींना उत्तम उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com