Bomblast In Pakistan: पाकिस्तानमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट, क्वेट्टा शहरात स्फोटामुळे अनेक जण जखमी

क्वेटा पोलिस मुख्यालय आणि क्वेटा कॅन्टोन्मेंटच्या प्रवेशद्वाराजवळच हा स्फोट झाला.
Bomblast In Pakistan
Bomblast In PakistanDainik Gomantak

पाकिस्तानातमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटाला एक आठवडा देखील पूर्ण झाला नसताना, पाकिस्तानमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट झाला आहे. बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथे मोठा बॉम्बस्फोट झाला असून, यात अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र मृतांची संख्या अद्याप कळू शकलेली नाही.

पाकिस्तानी संकेतस्थळ 'डॉन डॉट कॉम'ने याबाबत वृत्त दिले आहे. रविवारी सकाळी एफसी मुसा चेकपॉईंटजवळ हा स्फोट झाला, ज्यामध्ये पाचपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्वेटा पोलिस मुख्यालय आणि क्वेटा कॅन्टोन्मेंटच्या प्रवेशद्वाराजवळच हा स्फोट झाला.

Bomblast In Pakistan
Pakistan Army Judiciary: पाकिस्तानात लष्कर, न्यायालयाविरोधात बोलल्यास 'इतकी' वर्षे तुरुंगवास

स्फोटानंतरचे व्हिडीओ फुटेज समोर आले आहे. जखमींना क्वेटा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले असून परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. अशी माहिती घटनास्थळी बचाव कार्याचे नेतृत्व करणारे झीशान अहमद यांनी डॉन डॉट कॉमला दिली आहे.

पेशावर येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 100 जण ठार

पाकिस्तानच्या पेशावर शहरातील उच्च सुरक्षा असलेल्या भागात सोमवारी दुपारच्या प्रार्थनेदरम्यान खचाखच भरलेल्या मशिदीमध्ये एका तालिबानी आत्मघातकी बॉम्बरने स्वत:ला उडवले, ज्यात किमान 100 लोक ठार झाले आहेत. तर, 150 हून अधिकजण जखमी झाले आहेत, ज्यात बहुतांश पोलिस कर्मचारी आहेत.

Bomblast In Pakistan
Ban On Chinese Apps: चीनी अ‍ॅप्सवर भारताचा डिजिटल स्ट्राईक; तब्बल 'इतक्या' अ‍ॅप्सवर घातली बंदी...

राजधानीचे पोलिस अधिकारी (सीसीपीओ) मोहम्मद एजाज खान यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, तालिबानी आत्मघातकी हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणला. मंगळवारी त्याच संशयित हल्लेखोराचे शीर खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी पेशावर येथील घटनास्थळावरून जप्त करण्यात आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा हल्ला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या फिदायनने केला आहे. आपला कमांडर उमर खालिद खुरासानी याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवून आणल्याचे टीटीपीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. टीटीपी कमांडरला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पाकिस्तानी सैन्याने ठार केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com