Germany Get's New Defence Minister: बोरिस पिस्टोरियस बनले जर्मनीचे नवे संरक्षण मंत्री

Germany Get's New Defence Minister: बोरिस पिस्टोरियस यांची जर्मनीचे नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Boris Pistorius
Boris PistoriusDainik Gomantak

Germany Get's New Defence Minister: बोरिस पिस्टोरियस यांची जर्मनीचे नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी (17 जानेवारी) त्यांची नियुक्ती झाल्यानंतर, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी स्वत: एक निवेदन जारी करुन याची पुष्टी केली. क्रिस्टीन लॅम्ब्रेख्त यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पिस्टोरियस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, आपल्या देशाचे उत्कृष्ट राजकारणी बोरिस पिस्टोरियस (Boris Pistorius) देशाचे नवे संरक्षण मंत्री होणार आहेत, याचा मला आनंद आहे, असे जर्मन चान्सलर म्हणाले. अनुभव, क्षमता आणि नेतृत्व या पदासाठी सर्वात योग्य व्यक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.

Boris Pistorius
तालिबान सरकार स्थापनेनंतर जगभरातून प्रतिक्रिया, चीन समाधानी तर जर्मनी कठोर

तसेच, पिस्टोरियस यांची नियुक्ती जर्मन संरक्षण मंत्री क्रिस्टीन लॅम्ब्रेख्त यांच्या राजीनाम्यानंतर झाली आहे. वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी सोमवारी (16 जानेवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, DW या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशिया-युक्रेन युद्धात वेळेवर रणगाडे पाठवण्यात आलेले अपयश हे त्यांच्या राजीनाम्याचे (Resignation) मूळ कारण असल्याचे सांगितले जात आहे.

Boris Pistorius
युरोप पुन्हा लॉकडाऊनमध्ये..जर्मनी आणखी पाच महिने बंद

बोरिस पिस्टोरियस कोण आहेत?

बोरिस पिस्टोरियस हे गेल्या 9 वर्षांपासून लोअर सॅक्सनीचे गृहमंत्री (गृहमंत्री) आहेत. ते तिथेही खूप लोकप्रिय आहेत, स्कोल्झ यांच्या नजरेत ते अशा प्रकारचा व्यक्ती आहेत, जे दिलेले काम वेळेत पूर्ण करतात. 2013 पासून, पिस्टोरियस हे लोअर सॅक्सनीमधील SPD-नेतृत्वाखालील सरकारमध्ये (Government) अंतर्गत सुरक्षा, सायबर गुन्हे, स्थलांतर आणि खेळाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com