मास्क न घातल्याने ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनाही भरावा लागला दंड

मास्क न घातल्याने ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनाही भरावा लागला दंड
bolsonaro 1.jpg

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना (Jair Bolsonaro) (Brazil) कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 100 डॉलर्सचा दंड भरावा लागला आहे. बोल्सोनारो यांनी आपल्या समर्थकांच्या रॅलीमध्ये सहभागी झाल्यानंतर मास्क घातला नव्हता तसेच मोठी गर्दी जमवली होती. साओ पाऊलो (Sao Paulo) भागामध्ये ही कारवाई करण्यात आली. 

साओ पाऊलोमध्ये Accelerate for Christ ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचं प्रमुखपद बोल्सोनारो यांच्याकडे होते. त्यांनी या रॅलीमध्ये सहभागी झाल्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. बोल्सोनारो यांनी पुढील वर्षी होणाऱ्या फेरनिवडणुका घेण्यासाठी ही रॅली आयोजित केली होती. मात्र त्यांनी याबद्दलची अधिक सूचना साओ पाऊलोचे राज्यपाल आणि त्यांचे राजकीय शत्रू असणाऱ्या जोआओ डोरिया (Joao Doria) यांना दिलेली नव्हती. यावर डोरिया म्हणाले, जर त्यांनी कोरोना नियमांचे पालन केले नाही तर त्यांना दंड भरावाच लागले.  

डोरिया तसेच इतर राज्यपालांबरोबर बोल्सोनारो यांचे कोरोना नियमांची पायमल्ली केल्याबाबत सतत खटके उडत असतात. कोरोनामुळे आत्तापर्यंत ब्राझीलमध्ये चार लाख 85 हजार मृत्यू झाले आहेत. जगात सर्वाधिक मृत्यूंच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. बोल्सोनारो यांनी मास्क वापरणे, कायमच घरी राहणे अशा कोरोना नियमांवर कायमच टीका केली आहे. मात्र त्यांनी  हायड्रोक्लोरोक्विन, क्लोरोक्विन (Chloroquine) अशा औषधांच्या वापराला पाठिंबा देत  आहेत. मात्र या औषधांचा कोरोना उपचारामध्ये काहीही उपयोग होत नाही.


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com