ऑक्सफर्डच्या कोविशिल्डला ब्रिटनमध्ये हिरवा कंदील

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेकाच्या लशीला ब्रिटने बुधवारी हिरवा कंदील दाखविला.

लंडन: कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेकाच्या लशीला ब्रिटने बुधवारी हिरवा कंदील दाखविला. कोविशिल्ड नावाने ओळखल्या जाणाऱ्या या लशीच्या तातडीच्या वापरासाठी परवानगी देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश बनला आहे. 

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लशीच्या वापरासाठी वैद्यकीय विभाग आणि आरोग्य उत्पादने नियामक संघटने (एमएचआरए)च्या शिफारशी स्वीकारल्या असल्याचे ब्रिटनच्या सरकारने आज जाहीर केले. पुढील आठवड्यात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ॲस्ट्राझेनेकाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन वर्षात लसीकरण सुरू होण्यासाठी लशीचा पहिला डोस वितरित केला जाईल.

संबंधित बातम्या