New Prime Minister Liz Truss यांचा पगार किती? 'या' आव्हानांचा करावा लागणार सामना

UK Prime Minister: सर्वसामान्य नागरिकांवर पडणारा महागाईचा भार कमी करण्याचाही त्या प्रयत्न करणार आहेत.
New Prime Minister Liz Truss
New Prime Minister Liz Truss Dainik Gomantak

UK Prime Minister: लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान असतील. निवडणुकीमध्ये 82.6 टक्के मतदान झाले, त्यात सुनक यांना 60,399 तर ट्रस यांना 81,326 मते मिळाली. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे 172,437 सदस्य मतदानासाठी पात्र होते, तर 654 मते नाकारण्यात आली. पंतप्रधान झाल्यानंतर आता ट्रस यांच्यासमोर ब्रिटनची ढासळणारी अर्थव्यवस्था मजबूत करणे, ऊर्जेच्या किमती कमी करणे आणि पक्षातील दरी कमी करणे ही मोठी आव्हाने आहेत. सर्वसामान्य नागरिकांवर पडणारा महागाईचा भार कमी करण्याचाही त्या प्रयत्न करणार आहेत.

अशा स्थितीत, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी काय करावे, हे जाणून घेण्यातच लोकांचे हित आहे. त्यांना किती पगार मिळतो आणि पंतप्रधान म्हणून त्यांना कोणते अधिकार आहेत?

New Prime Minister Liz Truss
Liz Truss UK PM: कोण आहेत लिझ ट्रस; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

पंतप्रधानांचा पगार किती?

ब्रिटनच्या पंतप्रधानांना राहण्यासाठी अधिकृत निवासस्थान मिळते, ज्याला '10 डाउनिंग स्ट्रीट' म्हणतात. येथे पंतप्रधानांचे कार्यकारी कार्यालय आहे, जिथे ते सर्व बैठका घेतात. 10 डाउनिंग स्ट्रीट हे 1735 पासून पंतप्रधान निवास म्हणून वापरले जात आहे. तथापि, बोरिस जॉन्सन (Boris Johnson) सारख्या काही पंतप्रधानांनी राहण्यासाठी 11 क्रमांकाचा पर्याय निवडला, जो क्रमांक 10 पेक्षा खूप मोठा आहे. ब्रिटनच्या (Britain) पंतप्रधानांचा पगार 164,080 पौंड (1,50,58,516 रुपये) आहे. यामध्ये 84,144 पौंड (77,22,354 रुपये) खासदार बनण्यासाठी आणि उर्वरित 79,936 (73,36,162 रुपये) पंतप्रधानपदासाठी दिले जातात. तथापि, बोरिस जॉन्सन यांनी केवळ 75,440 पौंड पीएम भत्ता घेतला.

New Prime Minister Liz Truss
UK PM New Liz Truss: ऋषी सुनक यांचा पराभव करुन लिझ ट्रस बनल्या ब्रिटनच्या पंतप्रधान

लिझ ट्रसची जबाबदारी काय असेल?

विशेष म्हणजे, ब्रिटनचे पंतप्रधान सरकारच्या सर्व धोरणांसाठी आणि निर्णयांना जबाबदार असतात. त्यांचे काम सरकारच्या (Government) सदस्यांना निवडून देणे, ज्यांना मंत्री म्हणतात. पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांना कॅबिनेट मंत्री बनवले जाते आणि त्यांना अर्थ मंत्रालय, गृह मंत्रालय यासारखे सरकारी विभाग दिले जातात. पंतप्रधान कधीही मंत्र्यांना त्यांच्या पदावरुन हटवू शकतात. सरकारी विभाग रद्द करुन तो नवीन विभागही निर्माण करु शकतात. पंतप्रधान कर आणि खर्च धोरणांचे प्रभारी आहेत. पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री नवे कायदे आणू शकतात, जोपर्यंत त्यांना संसदेचा पाठिंबा असतो तोपर्यंतच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com