ब्रिटीश कमिश्नर भारतीय खाद्यसंस्कृतीच्या प्रेमात

ब्रिटीश कमिश्नर Alex Ellis महाराष्ट्राच्या वडा पावचा आनंद घेताना दिसले
ब्रिटीश कमिश्नर भारतीय खाद्यसंस्कृतीच्या प्रेमात
British Commissioner Alex EllisTwitter/@AlexWEllis

हल्ली ब्रिटीश आयुक्त (British Commissioner) अ‍ॅलेक्स अ‍ॅलिक्स (Alex Ellis) आपल्या ट्विटर अकाऊंटवर भारतातील विविध पदार्थांचे फोटो शेअर करत आहेत. त्याच वेळी, सोशल मीडिया वापरकर्ते देखील त्यांच्या या फोटोंवर खुप पॉझीटिव्हली रिअ‍ॅक्शन देत आहेत. या फोटोंवर सतत त्यांचे अभिप्राय देत आहेत. मसाला डोसा खावून पाहिल्यानंतर अ‍ॅलिक्स आता महाराष्ट्राच्या वडा पावचा आनंद घेताना दिसले आहेत. ट्विटरवर फोटो शेअर करताना अ‍ॅलिक्स यांनी त्याला साजेसं कॅप्शनही दिलं आहे. "मुंबईत #वडापाव खाण्याची नेहमीच वेळ असतो. हे भारी आहे!" असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. त्याचबरोबर 'खुप सुंदर मुंबई म्हणत' मुंबईचं दर्शन घडविणारा व्हिडिओही शेअर केला आहे.

British Commissioner Alex Ellis
रशिया युक्रेनमध्ये होऊ शकते 'युद्ध'! राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की म्हणाले....
British Commissioner Alex Ellis
British Commissioner Alex Ellis Twitter/@AlexWEllis

ब्रिटिश आयुक्त सध्या मुंबईत आहेत. ते येथील राजकारणी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. पण त्यांचे ट्विटर हँडल बघून असे वाटत नाही की ते खूप व्यस्त आहेत. त्यांना त्यांचा कामाचा व्याप असतांना देखिल ते भारतीय खाद्यपदार्थांना आस्वाद घेतांना दिसत आहेत. अलीकडेच अ‍ॅलिक्स यांनी गेट वे ऑफ इंडियासमोर उभे राहून वडा पाव खातांनाचा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टला 21 हजारांहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे, तर शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत. यातील काहींनी खुप मजेदार कमेंट्स त्यांच्या पोस्टवर केल्या आहेत. त्याचबरोबर अ‍ॅलिक्स यांनी बाप्पांचही दर्शन घेत फोटो शेअर केलाय.

British Commissioner Alex Ellis
British Commissioner Alex EllisTwitter/@AlexWEllis

बिहारच्या एका युजर्सने 'एकदा करून पण पहा. वडा हा पावचा भाऊ आहे. फक्त तो थोडा लहान आहे.' अशी मजेशीर कमेंट त्यांचा या पोस्टवर करण्यात आली. बर्याच वापरकर्त्यांनी अ‍ॅलेक्स यांना स्ट्रीट फूड खाण्याचा सल्लाही दिला. पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणाऱ्या महागड्या नाश्त्यापेक्षा रस्त्यावरील नाश्त्याची चव अधिक चांगली असते. म्हणून त्याच पदार्थांचा आनंद घेण्यासाठी सगळे बाहेर पडतात. एवढच काय दादरच्या कीर्ती महाविद्यालयाबाहेर चा वडापाव खावून बघण्याचा आग्रहही एका युजर्सने कमेंट करून केलाय. आणि म्हणाला की हे मुंबईत उपलब्ध असलेले सर्वोत्तम वडा पाव आहे.

British Commissioner Alex Ellis
अफगाण सरकारचा 'सीक्रेट डेटा' लागला पाकिस्तानच्या हाती?

भारतामध्ये उच्चायुक्त म्हणून नियुक्त होण्यापूर्वी अ‍ॅलेक्स यांनी परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाच्या एकात्मिक पुनरावलोकनासाठी उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम केले. त्यांना देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत चांगला अनुभव आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com