गे अन् बाइसेक्सुअल पुरुषांनो सावधान! ब्रिटीश आरोग्य तज्ञांनी मंकीपॉक्सबद्दल दिला इशारा

युनायटेड किंगडम (UK) च्या आरोग्य संरक्षण एजन्सीने समलिंगी आणि बाइसेक्सुअल पुरुषांना चेतावणी दिली आहे.
Vaccination
VaccinationDainik Gomantak

युनायटेड किंगडम (UK) च्या आरोग्य संरक्षण एजन्सीने समलिंगी आणि बाइसेक्सुअल पुरुषांना चेतावणी दिली आहे. शरीरावर पुरळ किंवा फोड आढळल्यास विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा. 6 मे पासून ब्रिटनने नवव्या मंकीपॉक्स प्रकरणाची नोंद झाल्यानंतर हा इशारा दिला आहे. (British Health Experts Warns Gay And Bisexual Men About Monkeypox)

दरम्यान, यूकेच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेने म्हटले आहे की, विषाणूचा लोकांमध्ये सहजपणे प्रसार होत नाही, परंतु अलीकडील प्रकरणे समलिंगी, बाइसेक्सुअल आणि एमएसएम समुदायांमध्ये आढळून आली आहेत. "आम्ही या गटातील लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देत आहोत," असे एजन्सीने म्हटले आहे. त्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागावर, विशेषत: त्यांच्या गुप्तांगांवर पुरळ किंवा फोड असल्यास लैंगिक आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.'

Vaccination
सिंगापूरच्या Zilingo कंपनीने भारतीय वंशाच्या CEO अंकिती बोस यांची केली हकालपट्टी

मंकीपॉक्सचा (Monkeypox) पूर्वी लैंगिकेच्या माध्यमातून प्रसार होत नसल्याचे सांगण्यात आले होते. परंतु लैंगिक संबंधादरम्यान थेट संपर्काद्वारे मंकीपॉक्स प्रसारित होऊ शकतो. यूकेएचएसएचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. सुसान हॉपकिन्स म्हणाले की, एजन्सी समुदाय संक्रमणाच्या भीतीने या संसर्गाच्या स्त्रोताचा तातडीने तपास करत आहे. ते पुढे म्हणाले की, हा 'दुर्मिळ' विषाणू आहे.

"आम्ही विशेषतः समलिंगी आणि बाइसेक्सुअल पुरुषांना कोणत्याही पुरळ किंवा फोडांबद्दल जागरुक राहण्यासाठी आणि विलंब न करता आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करत आहोत," डॉ हॉपकिन्स यांनी UKHSA ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Vaccination
कोविड-19 च्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी आणि स्वच्छता करण्यासाठी भारतीय कंपनीने केली ड्रोनची निर्मिती

पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, रुग्णांना न्यूकॅसल आणि लंडनमधील रुग्णालयातील संसर्गजन्य रोगांच्या विशेषज्ञ युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे.

तसेच, या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) लैंगिक संपर्कातून पसरणाऱ्या संसर्गावर चिंता व्यक्त केली होती. "आम्ही पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणार्‍या पुरुषांमध्ये संक्रमण पाहत आहोत," इब्राहिमा सोस फॉल, डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन विभागाचे सहायक महासंचालक म्हणाले. युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने अशीच चिंता व्यक्त केली आहे.

Vaccination
मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे CEO सत्या नडेला यांच्या 26 वर्षीय मुलाचे निधन

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स हा एक विषाणू आहे, जो उंदीर आणि प्राइमेट सारख्या वन्य प्राण्यांमुळे उद्भवतो. त्यानंतर आता लोकांमध्ये त्याची लक्षणे दिसू लागली आहेत. बहुतेक प्रारंभिक संक्रमण मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत (West Africa) नोंदवले गेले. मंकीपॉक्सचे दोन मुख्य प्रकार आहेत - काँगो स्ट्रेन, जो अधिक घातक आहे. त्याचबरोबर मृत्यू दर 10 टक्क्यांपर्यंत आहे. दुसरा पश्चिम आफ्रिकन स्ट्रेन, ज्याचा मृत्यू दर सुमारे 1 टक्के आहे.

त्याची लक्षणे काय आहेत?

आरोग्य तज्ञ म्हणतात की, बहुतेक रुग्णांना ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा जाणवतो. तथापि, गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर आणि हातावर पुरळ आणि फोड येऊ शकतात.

Vaccination
UN जनरल असेंब्लीने मानवाधिकार परिषदेतून रशियाची केली हकालपट्टी

त्याची लक्षणे काय आहेत?

आरोग्य तज्ञ म्हणतात की, बहुतेक रुग्णांना ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा जाणवतो. तथापि, गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर आणि हातावर पुरळ आणि फोड येऊ शकतात.

हे आणखी कुठे सांगितले आहे?

युनाइटेड किंगडम (United Kingdom) व्यतिरिक्त, इटली (Italy) आणि स्वीडनमध्ये देखील प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अमेरिकेने या वर्षातील पहिले प्रकरण नोंदवले. तो अमेरिकन नागरिक नुकताच कॅनडाला गेला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com