UK: 'आपण आपल्या देशात दहशतवाद्यांना आसरा देत आहोत !' ब्रिटिश खासदाराने संसदेत मांडला मुद्दा

UK: आपण भारतीय दूतावासाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहोत.
Indian Flag
Indian FlagDainik Gomantak

UK: ब्रिटनमध्ये खलिस्तानकडून भारताच्या दूतावासावर हल्ला करण्यात आला होता. ब्रिटनच्या संसदेत हा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे.

आता ब्रिटनच्या संसदेतील सदस्य बॉब ब्लॅकमॅन यांनी ब्रिटनच्या संसदेत आत्ता आपण खलिस्तानी लोकांना आपल्या देशात जागा देत आहोत.

त्यांना कायमचे बंद करण्यासाठी आपण काही उपाययोजना करु शकत नाही का असा प्रश्न विचारला आहे. यावर उत्तर देताना पेनी मोर्डंट यांनी म्हटले आहे की आपण भारतीय दूतावासाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहोत.

Indian Flag
Deutsche Bank: आता जर्मनीतील सर्वात मोठी बँक अडचणीत; शेअर्समध्ये मोठी घसरण

भारतीय दूतावासाच्या सुरक्षेसंबंधी आपण चिंतित असून याप्रकरणाबाबत आपण सातात्याने भारताच्या संपर्कात आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

याआधीदेखील बॉब ब्लॅकमॅन यांनी खलीस्तानच्या कृत्यांचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, रविवारी ब्रिटनमधल्या भारतीय दूतावासावर हल्ला करण्यात आला होता. याबरोबरच तिरंगा उतरवण्याचादेखील प्रयत्न केला होता. आता ब्रिटनची संसद यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com