Fire In Maldives: मालदीवमध्ये इमारतीला आग; 9 भारतीयांसह 11 जणांचा मृत्यू

28 जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश; 9 जण अजुनही बेपत्ता
Fire In Maldives:
Fire In Maldives:Dainik Gomantak

Fire In Maldives: मालदीवच्या माले शहरात गुरूवारी एका बिल्डिंगच्या गॅरेजमध्ये लागलेल्या आगीत 9 भारतीयांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री आग लागली होती, गुरूवारी सकाळी या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

Fire In Maldives:
Twitter Official Label: ट्विटरवर नवे 'Official' लेबल, काही वेळानंतर काढले, वाचा एका क्लिकवर काय आहे कारण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 12:30 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. तेव्हा आमच्यासह अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहचल्या. आग भीषण होती. त्यामुळे पसरत जाऊन तिने संपुर्ण इमारतीलाच कवेत घेतले. अग्निशमनच्या चार गाड्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर पहाटे साडे चारच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.

या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर स्थलांतरित कामगार राहत होते. यातील बहुतांशी भारत, बांग्लादेश, श्रीलंकेचे आहेत. या दुर्घटनेत भारताच्या नऊ, बांग्लादेशच्या एकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, या इमारतीला लागलेली ही तिसरी आगीची घटना आहे. दोन महिन्यांपुर्वीही या इमारतीला आग लागली होती.

Fire In Maldives:
Russia Ukraine War: जगातील सर्वात मोठे विमान पुन्हा घेणार उड्डाण, पुनर्बांधणीसाठी अब्जावधीचा खर्च

मालदीव नेशनल डिफेंस फोर्स (MNDF) ने दिलेल्या माहितीनुसार जवळपास 28 जणांचा जीव वाचविण्यात यश आले आहे. इमारतीत किती लोक होते, याची काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही. एका छोट्या खिडकीतून मोठ्या प्रयत्नांतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना अनेकांना सुखरूप बाहेर काढले. पण बाकिच्यांना वाचविण्यात यश आले नाही. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसले तरी गॅरेजमध्ये विविध प्रकारचे गॅसेस होते. त्यामुळे आग लागलेली असू शकते, असे पोलिसांनी सांगितले.

पहिल्या मजल्यावर सात जणांचे मृतदेह आढळून आले तर 2 जखमी होते. त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे. त्यातील एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर आणखी दोन मृतदेह आढळून आले. मृतांची संख्या आणखी वाढू शकते, असे एका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com