California Shooting: कॅलिफोर्नियामध्ये 10 लोकांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याने स्वतःलाही संपवले

मॉन्टेरी पार्कमध्ये चायनीज लूनर न्यू इयर सेलिब्रेशन सुरू असताना एका व्यक्तीने अचानकपणे बेछुट गोळीबार केला.
California Shooting
California ShootingDainik Gomantak

California Shooting: अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जण ठार झाले.

कारवाई करत, कॅलिफोर्निया पोलिसांनी तात्काळ कार्यभार स्वीकारला. हल्लेखोर आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला, ज्यात हल्लेखोराने व्हॅनमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. यासोबतच रविवारी झालेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाले. या घटनेपासून पोलीस बचावकार्यात गुंतले आहेत.

हल्लेखोरासोबत चकमक झाल्यानंतर पोलीस व्हॅनजवळ पोहोचताच त्यांना व्हॅनमधून गोळीबाराचा आवाज आला. पोलिसांनी जवळ जाऊन पाहिले असता हल्लेखोर व्हॅनमध्ये मृतावस्थेत आढळून आला.

कॅलिफोर्निया पोलिसांनी हल्लेखोराची ओळख 72 वर्षीय हू कॅन ट्रॅन अशी केली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कॅलिफोर्नियाच्या गोळीबारात मारल्या गेलेल्यांना श्रद्धांजली म्हणून अमेरिकेचे ध्वज खाली उतरवण्याचे आदेश दिले आहेत.

सीएनएन या वृत्तसंस्थेनुसार, मॉन्टेरी पार्कमध्ये लोक पारंपरिक चीनी नववर्ष साजरे करत असताना ही घटना घडली. ज्या भागात हा गोळीबार झाला तो भाग लॉस एंजेलिस शहर मुख्यालयापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर आहे. ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला तेथे गोळीबाराच्या वेळी हजारोंची गर्दी जमली होती, मात्र यामध्ये किती लोक जखमी झाले आहेत याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.

  • गोळीबाराचे कारण स्पष्ट झालेले नाही

या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, शूटर डान्स क्लबमध्ये घुसला, त्याने बंदूक काढून बेछुट गोळीबार सुरू केला. त्यानंतर गोंधळ झाला आणि त्याचा फायदा घेत तो फरार झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com