या पाच निर्बंधाची अंमलबजावणी करून भारत करु शकेल का कोरोनावर मात ?

Britan corona
Britan corona

जगभरातील इतर देशांप्रमाणे भारतातही कोरोनाचा संसर्ग वेगाने (Corona Second Wave) पसरत चालला आहे. दुसऱ्या लाटेने जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. परंतु अशा चिंताजनक परिस्थितीमध्ये सुद्धा काही देशांमध्ये कोरोनाची लाट ओसरत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यातील एक देश मध्ये ब्रिटन. (Briten) ब्रिटनने कोरोणानावर यशस्वीरीत्या मात केल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ब्रिटनमध्ये  कोरोनाने चिंताजनक परिस्थिति निर्माण झाली होती. मात्र या सर्व परिस्थितीवर मात करत ब्रिटन हळूहळू कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडत आहे. पण  ब्रिटनने असे नक्की काय केले की तेथील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. जगात सध्या ब्रिटन एकमेव देश आहे की जिथे कोरोना विषाणू आटोक्यात आला आहे. मग आता ब्रिटनप्रमाणे भारत (India) देखील अशाच पद्धतीने कोरोनावर मात करू शकतो का, असं प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. ( Can India overcome the Corona by implementing these five restrictions?)

- भारताप्रमाणेच नव्या स्ट्रेनचे थैमान 
वेरिएंट बी 117 (B 117 VARIANT) या कोरोना विषाणूमुळे ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना विषाणूतील आनुवंशिक  घटकांमधील  बदलामुळे या वेरिएंट बी 117 चा प्रसार होऊ लागला. हा 70 टक्केपेक्षा जास्त घातक होता. डिसेंबरपर्यंत एकट्या लंडनमध्येच या संसर्गाचा  प्रसार 62 टक्के झाला होता. हा विषाणू भारतसह, अमेरिका आणि आफ्रिका या देशात वाढत गेला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी  60 ते 67 हजार रुग्ण आढळत होते. 20 जानेवारीला ब्रिटनमध्ये 1823 रुग्णांचा मृत्यू  झाला. यावेळी दुहेरी म्यूटेशनमुळे भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढली आहे. ब्रिटनमध्ये देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेरिएंट हे कारणीभूत आहे. सध्या कोरोनाने  भारतात हाहाकार माजवला आहे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी भारत सरकारकडून  कडक निर्बंध ही लागू केले आहेत.   

ब्रिटनमध्ये लागू केलेले कोणते आहेत ते पाच निर्बंध- 

- कठोर लॉकडाऊन
ब्रिटनमध्ये जानेवारीच्या सुरुवातीलाच  कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. प्रत्येक दिवशी 60 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळत होते, आणि मृत्यूमध्ये 20 टक्के वाढ झाली होती. या लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांनंतर 3 हजारापेक्षा जास्त रुग्णांची संख्या कमी झाली होती.     
 
- प्रथम डोस देण्यास विलंब 

लसीकरणाला वेग देण्यासाठी सरकारने डोस घेण्याचा कालावधी एक महिन्यावरून तीन महिन्यापर्यंत वाढविला.  यामुळे पुरवठा संकट आणि पहिल्या लसीकरणाच्या वेगवान विकासामुळे लोकाना संक्रमणास लढण्याची क्षमता विकसित करता आली. येथील 63.02 लोकांना डोस मिळाला. ज्यामुळे मृत्यु दर 95 टक्के पर्यंत कमी झाली.   

- दवाखान्यातील शिस्तबद्दपणा 
लंडनमधील (London) सेंट थॉमस हॉस्पिटल चे एमडी डॉ. निशिद सुद यांनी सांगितले की, दवाखाण्यामध्ये बेडसची कमतरता टाळण्यासाठी रुग्णालयातील व्यावस्थापकानी फक्त अतिगंभीर  लक्षण असलेल्या रुग्णांची भरती करण्याचा नियम बनवला.  साधारण लक्षणे असलेल्या व्यक्तीला बेडस किवा व्हेंटिलेटर देण्यावर लक्ष ठेवले गेले. 99 टक्के रुग्ण हे साधारण लक्षणे असलेले  असतात. फक्त गंभीर असलेल्या रुग्णांचा उपचार करण्यासाठी वैद्यकीय संसाधनाचा 1 टक्के वापर करावा. 

- सुरक्षा नियमांचे पालन
ब्रिटिश सरकारने सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी मास्क न वापरणाऱ्यांवर दंड आकारला.  सार्वजनिक ठिकाणी सहा लोकांपेक्षा जास्त लोकाना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. बार - रेस्टॉरंट पूर्णपणे बंद ठेवली आहेत. तसेच एकदा चाचणी अहवाल कोरोना पॉजिटिव आल्यावरही पुन्हा कोरोना टेस्ट करणाऱ्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.  

- तपासणीवर लक्ष 
कोरोनाचा संसर्ग जितक्या वेगाने वाढत चालला आहे तितक्याच वेगाने त्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. आवर वर्ल्ड इन डाटानुसार प्रत्येक एक हजार लोकसंख्येमागे 15.96 टक्के चाचण्या घेतल्या जात आहेत, तर भारतात फक्त 1.14 चाचण्या घेतल्या जात आहेत. सध्या  ब्रिटनमध्ये पॉजिटिव दर 0.2 टक्के आणि भारतात 17.8 टक्के आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com