Canada Elections: जस्टिन ट्रुडो पुन्हा सत्तेत येणार का? जाणून घ्या

प्रत्येक सर्वेक्षणात जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांचा पक्ष आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा मागे असल्याचे दिसून आले आहे.
Justin Trudeau
Justin TrudeauDainik Gomantak

देशाच्या 44 व्या संसदेची निवड करण्यासाठी कॅनडातील मतदार (Canada Election) सोमवारी मतदान करणार आहेत. कॅनडाचे उदारमतवादी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात घटली आहे. कंझर्वेटिव्ह नेते एरिन ओ टूल (Erin O Tool) यांनी त्यांना मोठ्या संकटात टाकले आहे. सर्व निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनी एरिन ओ टूल निवडणूक जिंकून जस्टिन ट्रुडो यांना धक्का देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक सर्वेक्षणात जस्टिन ट्रुडो यांचा पक्ष आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा मागे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या वेळी कॅनडामध्ये उजव्या विचारांचा पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता राजकीय तज्ञ व्यक्त करत आहे.

Justin Trudeau
Pakistan: पुन्हा एकदा हिंदू कुटुंबाचा छळ...

कॅनेडियन सरकारच्या आकडेवारीनुसार, या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 27 दशलक्षाहून अधिक लोक भाग घेणार आहेत. ज्यात सुमारे 57 लाख लोकांनी आधीच मतपत्रिकेद्वारे मतदान केले आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणानुसार, लिबरल किंवा उजव्या पक्षांना बहुमतासाठी आवश्यक 38% सार्वजनिक पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी देशात लवकर निवडणुका घेण्याची घोषणा केली होती, परंतु कोविड -19 संकट आणि अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर जस्टीन ट्रुडो सरकारबद्दल नाराजी असल्याचे निवडणूक सर्वेक्षणात समोर आले आहे.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या 'वामपंथी-केंद्र' सरकारला पूर्ण बहुमत देण्यासाठी दोन वर्ष अगोदर निवडणुका जाहीर केल्या, परंतु जस्टिन ट्रुडो यांच्या पक्षाला 2019 च्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळतील असा विश्वास आहे. 2019 पासून, ट्रुडो यांनी संसदेत केवळ अल्पसंख्यांकाची बाजू उचलून धरली आहे, ज्यामुळे ते इतर पक्षांवर शासन करण्यासाठी अवलंबून आहेत. ट्रुडो यांनी असा युक्तिवाद केला की, कोरोना महामारीने कॅनडाला दुसरे महायुद्धसारखे बनवले आहे. कॅनेडियन लोकांनी आता असे सरकार निवडले पाहिजे जे येत्या अनेक दशकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com